पिंपळगाव बसवंत: निफाड तालुक्याचे आमदार दिलीप बनकर यांनी पिंपळगाव बसवंत प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड लसीचा पहिला डोस शनिवार १३ रोजी घेतला. तिसऱ्या टप्यात लसीकरण मोहिमेला या महिन्यात सुरुवात झाली असून ६० वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या नागरीकांना व ४५ पेक्षा जास्त वय असलेल्या आणि गंभीर व्याधीने ग्रस्त असलेल्यानाही लस देण्यात येत आहे. नागरीकांनी आरोग्य यंत्रणेशी संपर्क करून नोंदणी करावी व लस घेऊन कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहभाग नोंदवावा असे आवाहन आमदार दिलीप बनकर यांनी तालुक्याच्या जनतेला यावेळी केले.
पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीच्या सरपंच अलका बनकर, तानाजी बनकर, चंद्रकांत विधाते, संपत विधाते, सुरेश खोडे, रामभाऊ माळोदे, कमल बनकर आदींनी यावेळी लसीचा पहिला डोस घेतला. यावेळी तालुका वैद्यकीय अधीक्षक डॉ.रोहन मोरे, कोविड संपर्क प्रमुख डॉ.चेतन काळे, ग्रामपालिका सदस्य गणेश बनकर, पिंपळगावचे वैद्यकीय अधिकारी डॉ.योगेश धनवटे, डॉ.जयेश निकुंभ, डॉ.रुपाली आहेर, डॉ.बकुळ अहिरे, डॉ.सागर गोरे, सविता तागट, मयूर चव्हाण, दिपक चव्हाण, शिरीन मांडे, डी.व्ही.जाधव आदी वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते.