पाटणा – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना काही तासांमध्येच पहिला झटका मिळाला आहे. शिक्षणमंत्री पदाची शपथ घेतलेल्या डॉ. मेवालाल चौधरी यांनी त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. हत्या आणि भ्रष्टाचाराच्या आरोप डॉ. मेवालाल यांच्यावर आहे. त्यामुळे राष्ट्रीय जनता दलासह अन्य विरोधी पक्षांनी नितीश यांच्यासह सरकारवर जोरदार हल्ला केला आहे. त्या सर्वाची दखल घेत डॉ. मेवालाल यांनी राजीनामा दिला आहे. २०१२ मध्ये शिक्षक भरती घोटाळ्यात डॉ. मेवालाल यांनी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे बिहारमधील राजकीय वातावरण तापल्याचे दिसून येत आहे.