पाटणा – बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासह सर्व मंत्र्यांनी त्यांच्या मालमत्तेचा तपशील जाहीर केला आहे. कॅबिनेट विभागाच्या वेबसाइटवर अपलोड केलेल्या तपशीलांनुसार, नितीशकुमार यांचे गायींवर प्रेम असून ते गोपालक आहेत. त्यामुळे लालू प्रसाद त्यांच्या कुटुंबातील गाई-संगोपनाची आठवण येते.
नितीश यांनी प्रसिद्ध केलेल्या माहितानुसार, नितीशकुमार यांचा मुलगा निशांत कोट्यधीश आहे. नितीशकुमारची रोकड सातत्याने कमी होत आहे, पण पशुधन वाढत आहे. मुख्यमंत्र्यांकडे सध्या १२ गायी आणि ६ वासरे आहेत. एक वर्षापूर्वी १० गायी आणि २ वर्षापूर्वी फक्त ८ गायी होत्या. म्हणजेच नितीश यांनी ३ वर्षात ४ गायी वाढवल्या आहेत. नितीशकुमार यांच्याकडे सध्या फक्त ३५ हजार ८८५ रुपये रोख आहेत. ते सातत्याने कमी होत आहेत. निशांतकडे केवळ २८ हजार २९७ रुपये रोख असले तरी त्याच्याकच्या अचल संपत्तीची किंमत एक कोटी ४८ लाख आहे. निशांत यांच्या पीपीएफ खात्यात २५ लाख ४३ गजार रुपये आहेत. ७८ लाखांची एफडी आहे. नितीश यांच्याकडे ११ लाखांची इको स्पोर्टस गाडी आहे. निशांतकडे ६ लाखांची ह्युंदाई कार आहे. नितीश यांच्याकडे ९८ हजाराचे तर निशांतकडे २० लाखांचे दागिने आबेत. नितीश यांच्याकडे १६ लाखांची चल आणि दिल्लीतील द्वारका येथे ४० लाखांचा फ्लॅट आहे.