नाशिक – आज केंद्रीय अर्थसंकल्पात नाशिक शहराच्या निओ मेट्रो प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्प म्हणून मान्यता देऊन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी त्यासाठी २९०० कोटींचा निधी उपलब्ध करून दिला यासाठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे जाहीर आभार भारतयी जनता पार्टीच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी व्यक्त केले.
या घोषणेवर बोलतांना त्या म्हणाल्या की, निओ मेट्रो प्रकल्पामुळे नाशिक शहरातील वाहतुकीची समस्या सुटणार असून नाशिक शहरात नव्याने उद्योग येण्यास त्याची मदत होणार आहे. राज्य शासनाने विकास कामांमध्ये राजकारण करून विकास कामांना स्थगिती देण्याची भूमिका बदलावी अशी माफक अपेक्षा यानिमित्ताने करत आहे.








