नाशिक – नासिक बार असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा येत्या १२ मार्च रोजी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. सायंकाळी ५.३० वाजता होणाऱ्या या सभेची लिंक सर्व वकील सभासदांना पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती बार असोसिएशनच्या अध्यक्षांनी दिली आहे.
ज्या सभासदांना नासिक बार असोसिएशनचा सन २०१९-२०चे ऑडीट रिपोर्ट् व बॅलन्स शिट बघावयाचे अथवा तपासावयाचे आहे. त्यांनी शुक्रवार ( ५ मार्दिच) ते रविवार (७ मार्च) या कालावधीत कार्यालयीन वेळेत नासिक बार असोसिएशनच्या कार्यालयात यावे. शंका असल्यास आपल्या हरकती नमूद कराव्यात, असे आवाहनही अध्यक्षांनी केले आहे.