नाशिक – मध्य रेल्वे भुसावळ विभागाच्या वाणिज्य विभागाकडून बिना तिकिटे प्रवास करणारे ,अनियमित तिकीट यात्रा ,ज्येष्ठ नागरिक सवलतीचा गैरवापर हे रोखण्यासाठी अनियमित यात्रा करणारे साठी विशेष तिकीट तपासणी मोहीम नासिकरोड स्टेशन येथे गरुवारी करण्यात आली.
भुसावळचे वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक युवराज पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार व मंडल वाणिज्य प्रबंधक बी.अरुण कुमार , सहाय्यक वाणिज्य प्रबंधक(टीजा), मंडल मुख्य तिकीट निरीक्षक आहुलवलीया यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष तिकीट तपासणी मोहीम झाली. या मोहिममध्ये एकूण १३५ अनियमित प्रवाशांना दंड आकारण्यात आला. १८ तिकीट तपासणी कर्मचारी यांनी प्रवाशांकडून एकूण ९१ हजार ९६० रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. त्यात बिना तिकीट प्रवास करणारे १३३ केसेस मधून ९१ हजार ४७० रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे.आणि दोन प्रवाशांकडून ४९० रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे.या मध्ये दंड भरण्यात असमर्थ होते असे ५ प्रवासी वर रेल्वे अधिनियम धारा द्वारा कारवाई करण्यात आली.