नाशिक – येथील प्रादेशिक परिवहन कार्यालय अर्थात आरटीओ येथे ४० सहाय्यक निरीक्षकांची नेमणूक होणार आहे. या अंतर्गत महसूल निर्मिती सुव्यवस्थित करणे आणि वाहन चालविण्यास परवाने व परवानग्यांच्या अटींचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली जाणार आहे.
सध्या ४० सहाय्यक निरीक्षकांचे प्रशिक्षण चालू सुरु असून ते प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर नाशिक कार्यालयात रुजू होणार आहेत. सध्या आरटीओ कार्यालयात १५ मोटार इन्स्पेक्टर कार्यभार सांभाळत आहेत. या अंतर्गत वाहन नोंदणी, ड्रायव्हिंग टेस्ट आयोजित करणे, परवाने देणे कामे केली जात आहेत. तसेच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. तसेच ६ इन्स्पेक्टर सध्या भरारी पथकात काम पाहत आहेत.
४० सहाय्यक निरीक्षण रुजू झाल्यास यंत्रणा अधिक सक्षम होणार आहे. दरवर्षी अंदाजे ३०० कोटी रुपये महसूल गोळा करण्याच्या प्रयत्नात आरटीओ असते. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करून हा महसूल वसूल केला जातो. नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई केली जाते व त्याद्वारे महसूल वसुलीचे काम सुरु असते. आरटीओमध्ये ४० सहाय्यक निरीक्षण पदे भरले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली आहे. वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी आरटीओ आणि पोलिस एकत्रित मोहीम राबवतील, असे मांढरे यांनी सांगितले.