नाशिक – जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मध्ये ७२.१४ टक्के, नाशिक शहरात ७४.९७ टक्के, मालेगावमध्ये ७५.६४ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८२.३२ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ७४.४२ इतके झाले आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज (१० ऑगस्ट) प्राप्त अहवालानुसार, जिल्ह्यातील १४ हजार ८६४ कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ४ हजार ५१३ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आत्तापर्यंत ५९७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक २९६, चांदवड ३९, सिन्नर २१४, दिंडोरी ६९, निफाड १८७, देवळा ७६, नांदगांव ७७, येवला ०६, त्र्यंबकेश्वर ०५, सुरगाणा १२, पेठ ००, कळवण ०३, बागलाण ५७, इगतपुरी ४८, मालेगांव ग्रामीण ८८ असे एकूण ११७७ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ३ हजार ०३४, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात २९१ तर जिल्ह्याबाहेरील ११ असे एकूण ४ हजार ५१३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात १९ हजार ९७४ रुग्ण आढळून आले आहेत.
मृत्यू :
नाशिक ग्रामीण १५०, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ३३७, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ८९ व जिल्हा बाहेरील २१ अशा एकूण ५९७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.