नाशिक – रेल्वे मुळे मनमाड आणि नाशिकचे अंतर असले तरी काही जण कामानिमित्त नाशिकला वास्तवास आले. अशा नाशिककर मित्रांनी आपल्या वर्ग मित्र – मैत्रीणीसाठी नाशिक येथे सेलीब्रेटा या हॅाटेलमध्ये स्नेहसंमेलन आयोजित केले. त्याला सर्वांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. हे संमेलन घेण्यासाठी संतोष हुकिरे, विजयानंद अहिरराव,शैलेश पगारे, संज्योत कुलकर्णी, वैशाली गुजराथी, अवतार सिंग चुग, रवी जगताप यांनी १९९१ या वर्षीची बी.कॉम ची सर्व वर्गमित्र शोधून ग्रुप तयार केला. त्यानंतर ३० वर्षांनी सर्व वर्गमित्र एकत्र आले.या स्नेहसोहळ्यात सर्वांनी एकमेकांचा महाविद्याल सोडल्यानंतर केलेल्या प्रगतीचा आढावा थोडक्यात सांगितला. त्यानंतर मैत्रीचे गीत, संगीत खुर्ची, फिशपॅाड हा कार्यक्रम झाला. त्यातून ३० वर्षापूर्वीचा महाविद्यालयीन जीवनाचा पट सर्वां समोर उभा राहिला.केक कापणे, ग्रुप फोटो काढणे असे सर्व कार्यक्रमा या मेळाव्यात झाले. त्यानंतर विजयानंद अहिरराव यांच्यातर्फे सर्वांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या मेळाव्यात निलेश खांदाट, सुनीला खरे, नसरीन मोमीन, कावेरी पारिख, सुवर्णा बरडिया, सुजाता बरडिया, कल्पना उबाळे, शर्मिला काळे, अर्चना गवळी, कुंदा म्हसाने, अजमद खान, सुरेश आहिरे, जितेंद्र चोरडीया, अजय पवार, लक्ष्मण कौराणी, अख्तर शेख, सुधाकर कातकडे, रविंद्र ढासे, विलास कातकडे, संतोष शिरसाठ, संजय मुथा, प्रकाश वडनेरे, प्रवीण हिरे, अजय राऊळ, राजेश खैरे, शब्बीर बोहरी, संजय शिरसाठ, रतन आहिरे, सध्या दाभाडे हे उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन परी पटेल, अजय राऊळ यांनी केले.