नाशिक – रक्षा मंत्रालयातर्फे ओझर येथे २४ व २५ डिसेंबरला रॅाकेट चाचणी होणार आहे. या चाचणीचा कालावधी ३८ सेंकदाचा असणार आहे. या चाचणीच्या ध्वनीची पातळी १८० डीबी आहे. सदर चाचणी ही नित्य परीक्षा असून या ध्वनीमुळे जवळपास रहिवाश्यांनी घाबरण्याचे कारण नाही. तसेच ध्वनीचा काही परिणाम होणार नाही असे डीआरडीओने स्पष्ट केले आहे. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापनाने सर्व तहसिलदारांना या बाबत माहिती देण्याच्या सुचना केल्या आहे. एेन नाताळात २४ व २५ डिसेंबरला धडामधुम होणार असला तरी नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही.