बुधवार, सप्टेंबर 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाशिक – २१ लाखाची ताडपत्री वाहनचालकाने परस्पर विकली, गुन्हा दाखल

by Gautam Sancheti
डिसेंबर 3, 2020 | 10:27 am
in क्राईम डायरी
0
crime diary 2

२१ लाखाची ताडपत्री वाहनचालकाने परस्पर विकली, गुन्हा दाखल
नाशिक – ताडपत्री व्यवसायात एकाने २१ लाखास गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. किरकोळ विक्रेत्यास पाठविलेली ताडपत्री वाहनचालकाने परस्पर विक्री करून अपहार केला असून याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी संशयीतास बेड्या ठोकल्या आहेत.
अंकुश शहादेव आवटे (३५ रा.करचुंडी जि. बिड) असे अटक केलेल्या संशयीत वाहनचालकाचे नाव आहे. याप्रकरणी सिमा ललवाणी (रा.गोविंदनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. ललवाणी यांचे मुंबईनाका परिसरातील किनारा हॉटेल भागात भक्ती ताडपत्री नावाची फर्म आहे. या फर्मच्या माध्यमातून राज्यातील किरकोळ विक्रेत्यांना विविध कंपनीची ताडपत्री वितरीत केली जाते. १० सप्टेंबर रोजी संशयीताच्या वाहनात बालाजी लॉजिस्टीक कंपनीची सुमारे २१ लाख ७ हजार ८१६ रूपये किमतीची ताडपत्री लोड करण्यात आली होती. लातूर येथील निकुंज भाई या वितरकाच्या आॅर्डरप्रमाणे पाठविण्यात ताडपत्री संशयीताच्या वाहनातून रवाना करण्यात आली होती. मात्र संशयीताने ताडपत्री इच्छीतस्थळी न पोहच करता स्व:ताच्या आर्थिक फायद्यासाठी ताडपत्रीची परस्पर विक्री केली. तीन महिने उलटूनही लातूर येथील व्यापा-याचे पैसे न मिळाल्याने ललवाणी यांनी संपर्क साधला असता ही घटना उघडकीस आली. पोलीसांनी संशयीतास अटक केली असून अधिक तपास उपनिरीक्षक मोहन पाटील करीत आहेत.
……
मटण विक्रेत्यास मारहाण
नाशिक – दुकानाचा पत्रा उचकटल्याचा जाब विचारल्याने एकाने लाकडी दांडक्याने मटन विक्रेत्यास बेदम मारहाण केल्याची घटना दिंडोरीरोड भागात घडली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी संशयीतास अटक केली आहे. संतोष कारभारी शेळके (रा.गजानन चौक,अवधुतवाडी) असे अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे. याप्रकरणी शकिल इब्राहिम खाटीक (५० रा.अवधूतवाडी दिंडोरीरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. खाटीक यांचे अवधूतवाडी येथे मटन विक्री दुकान असून, बुधवारी (दि.२) त्यांचा पुतण्या फारूख बाबुभाई शेख व ते आपल्या दुकानात असतांना ही घटना घडली. पुतण्याच्या तोंडओळखीच्या संशयीताने दुकानाचा मागील भागाचा पत्रा काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी खाटीक यांनी त्यास जाब विचारला असता संशयीताने लाकडी दांडक्याने त्यांना मारहाण केली. यावेळी पुतण्या आपल्या काकाच्या मदतीस धावून गेला असता संशयीताने शिवीगाळ करीत त्यास दमदाटी केली. या घटनेत खाटीक यांच्या हाताचे मनगटाचे हाड तुटले असून याप्रकरणी तक्रार दाखल होताच पोलीसांनी संशयीतास ताब्यात घेतले आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गिरी करीत आहेत.
……….
हॉटेल मालकांवर चाकू हल्ला
नाशिक – किरकोळ कारणातून एकाने हॉटेल मालक असलेल्या बापलेकावर चाकू हल्ला केल्याची घटना सिडकोत घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज मोंढे उर्फ गुड्या असे संशयीताचे नाव आहे. याप्रकरणी दादाजी देवराम काकुळते (रा.खुटवडनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. काकुळते यांचे परिसरात आदितेज नावाचे हॉटेल आहे. मंगळवारी (दि.१) दादाजी काकुळते व त्यांचा मुलगा आदित्य काकुळते आपल्या हॉटेलमध्ये तेथे आला. यावेळी परिचीत संशयीताने येवून तुमचे हॉटेल चांगले चालते अशी कुरापत काढून दादाजी काकुळते यांना शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी मारहाण केली. यावेळी मुलगा आपल्या पित्याच्या मदतीस धावून गेला असता संशयीताने हॉटेल मधील चाकू उचलून धमकी देत मुलाच्या हातावर वार केला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बेडवाल करीत आहेत.
……..
लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तरूणास लुटले
नाशिक – बसथांब्यावर सोडण्याच्या बहाण्याने ओमनी कारमध्ये बसवून दोघांनी सिन्नरच्या तरूणास लुटल्याची घटना कोटमगाव रोड भागात घडली. या घटनेत संशयीत दुकलीने मोबाईलसह रोकड बळजबरीने काढून घेतली असून, पोलीसांनी एकास तात्काळ बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार स्वप्निल वसंत सोनवणे (२२ रा.मोरेमळा,सामनगावरोड) असे अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे. याप्रकरणी विजय अनिल आव्हाड (२६ रा.केपानगरगाव ता.सिन्नर) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. आव्हाड मंगळवारी (दि.१) कामानिमित्त शहरात आला होता. रात्रीच्या सुमारास काम आटोपून तो आपल्या घरी जाण्यासाठी सिन्नर बस थांबाकडे पायी जात असतांना ही घटना घडली. कोटमगाव रोडवरील राधीका हॉटेल भागात पाठीमागून येणा-या एमएच ०२ एमए ९७९५ या ओमनी कार चालकाकडे त्याने काही अंतरावर असलेल्या बसथांबा पर्यंत लिफ्ट मागीतली. चालकाने आपल्या वाहनात बसवून सिन्नर बस थाबा कडे जात असतांना अर्ध्यावाटेत चालक व त्याच्या एका साथीदाराने आव्हाड यास दमदाटी करून त्याच्या खिशातील मोबाईल आणि चार हजाराची रोकड बळजबरीने काढून वाहनातून उतरवून दिले. आव्हाड यांनी कसे बसे पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल करताच पोलीसांनी एका संशयीतास बेड्या ठोकल्या असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शेळके करीत आहेत.
…….
१३ वर्षीय बालकाचे अपहरण
नाशिक – सिडकोतील खांडे मळा भागात राहणारा तेरा वर्षीय बालक दोन दिवसांपासून बेपत्ता असून त्याचे अपहरण करण्यात आल्याचा संशय त्याच्या कुटूंबियांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हार्दिक भिकाजी कोळकर (१३ रा.सदाशीव शांती अपा.खांडे मळा) असे अपहृत बालकाचे नाव आहे. हार्दिंक मंगळवार (दि.१) सायंकाळ पासून बेपत्ता आहे. अज्ञात व्यक्तीने त्यास कुठले तरी आमिष दाखवून कायदेशीर रखवालीतून अपहरण केल्याचा संशय कुटूंबियांनी वर्तविला आहे. याबाबत आई सावित्री कोळकर यांनी तक्रार दाखल केली असून अधिक तपास उपनिरीक्षक पावरा करीत आहेत.
…….
कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
नाशिक – भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीवर पाठीमागे बसलेला तरूण ठार झाला. हा अपघात मालधक्का परिसरात झाला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात कारचालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोहित सुनिल वाघमारे (२१) असे अपघातात मृत्यु झालेल्या तरूणाचे नाव आहे. मंगळवारी (दि.१) रात्री हा अपघात झाला होता. सुरज काळे (२७ रा.मालधक्का,गाडेकरमळ््याजवळ) हा आपला आतेभाऊ रोहित वाघमारे यास मोटारसायकलवर एमएच १७ बीटी ४४०८ बसवून आपल्या घराकडे जात असतांना हा अपघात झाला होता. पाथर्डी फाट्याकडून गाडेकर मळ््यात जात असतांना मालधक्का परिसरात पाठीमागून भरधाव आलेल्या एमएच ०४ डीबी ८२१५ या कारने दुचाकीस धडक दिली. या अपघातात दोघे भाऊ जखमी झाले होते त्यातील रोहित वाघमारे याचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असून अधिक तपास उपनिरीक्षक माळी करीत आहेत.
………
चुंचाळेत तलवारधारी जेरबंद
नाशिक – चुंचाळे येथील घरकुल योजना भागात एका तलवारधारी तरूणास पोलीसांनी जेरबंद केले. संशयीताच्या ताब्यातून धारदार तलवारीसह चॉपर हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात शस्त्रबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने केली. उत्तम पुंडलिक शिंदे (२६ रा.रूमनं.३१५,बिल्डींग क्र.सीएच – ए ०१,घरकुल योजना) असे अटक केलेल्या तलवारधारीचे नाव आहे. घरकुल योजनेतील एका मोकळया भूखंडावर तलवारधारी तरूण येणार असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी (दि.१) सायंकाळच्या सुमारास परिसरात सापळा लावण्यात आला होता. संशयीत मोकळया भूखंडावर दाखल होताच पोलीसांनी त्यास बेड्या ठोकल्या. त्याच्या ताब्यातून एका तलवारीसह धारदार चॉपर हस्तगत करण्यात आला असून युनिटचे संतोष माळोदे यांनी दिल्लेया तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस नाईक निकम करीत आहेत.
……
महिलेचा विनयभंग एकास अटक
नाशिक – रस्त्याने पायी जाणा-या महिलेचा पाठलाग करून विनयभंग करण्या-या ५० वर्षीय इसमात पोलीसांनी बेड्या ठोकल्या. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोशन भागीरत खैरे (५० रा.पाटील गल्ली,जुने नाशिक) असे संशयीताचे नाव आहे. याप्रकरणी जुनी तांबट लेन भागात राहणा-या २८ वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली आहे. २५ फेब्रुवारी पासून संशयीत महिलेचा पाठलाग करीत होता. तिवंधा लेन ते कुंभारवाडा दरम्यान महिला पायी जात असतांना संशयीत दुचाकीवर तिचा पाठलाग करायचा तसेच हॉर्न वाजवून अश्लिल हावभाव करायचा. परिसरातील संगिता नामक महिलेच्या माध्यमातून त्याने महिलेचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक अनवणे करीत आहेत.
………
चक्कर येवून पडल्याने एकाचा मृत्यु
नाशिक – राहत्या घरात चक्कर येवून पडल्याने ६६ वर्षीय वृध्दाचा मृत्यु झाला. ही घटना जेलरोड भागात घडली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. राजेंद्रप्रसाद रामदयाल शर्मा (रा.नारायणबापू नगर सायखेडारोड) असे मृत वृध्दाचे नाव आहे. शर्मा बुधवारी (दि.२) सकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरात चक्कर येवून पडले होते. या घटनेत त्यांच्या डोक्यास मार लागल्याने कुटूबियांनी त्यांना तात्काळ बिटको रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार सोनवणे करीत आहेत.
……..
भिंत पडल्याने तरूणाचा मृत्यु
नाशिक – सोसायटीची वॉल कंपाऊंडची अर्धवट तुटलेली भिंत पायावर पडल्याने २० वर्षीय तरूणाचा मृत्यु झाला. ही घटना शेरे मळा भागात घडली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. शुभम प्रकाश सुर्यवंशी (२० रा.हरीकृष्ण सोसा.अमरधामरोड) असे मृत युवकाचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शुभम आपल्या सोसायटीच्या आवारात खेळत असतांना ही घटना घडली. वॉलकंपाऊड भिंतीजवळ उभा असतांना अचानक अर्धवट तुटलेली भिंत त्याच्या पायावर कोसळली. या घटनेत त्याच्या उजव्या पायास गंभीर दुखापत झाली. कुटूंबियांनी त्यास तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता बुधवारी (दि.२) दुपारी उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यु झाला. अधिक तपास पोलीस नाईक गवळी करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – वेगवेगळ्या भागातील तिघांची गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

गुडन्यूज. वर्षारंभीच भारतात येणार २ ते ३ लस; डॉ. रणदीप गुलेरियांची माहिती

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Raj Thackeray1 2 e1752502460884
संमिश्र वार्ता

राज ठाकरे यांनी अमित शाह, जय शाह यांचे प्रतिकात्मक व्यंगचित्र काढून केला हल्लाबोल…

सप्टेंबर 17, 2025
e vidhya 1024x275 1 e1758078658915
संमिश्र वार्ता

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी नवे ज्ञानविश्व…तब्बल २०० शैक्षणिक टीव्ही वाहिन्या

सप्टेंबर 17, 2025
eknath shinde
महत्त्वाच्या बातम्या

राज्यात ३९४ नगरपरिषदा, नगरपंचायतींमध्ये नमो उद्यान…प्रत्येक उद्यानासाठी १ कोटीचा निधी

सप्टेंबर 17, 2025
FB IMG 1758073921656 e1758074047317
संमिश्र वार्ता

कोकणच्या सौंदर्याचा ‘दशावतार’…बॉक्स ऑफीसवर तुफान हीट…

सप्टेंबर 17, 2025
कांद्याच्या भावासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी बैठक 1 1024x683 1
संमिश्र वार्ता

कांदा निर्यात अनुदान दुप्पट करण्याची केंद्र सरकारकडे मागणी….पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

सप्टेंबर 17, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी प्रलोभनांपासून दूर रहावे, जाणून घ्या,बुधवार, १७ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 16, 2025
IMG 20250916 WA0355 1
स्थानिक बातम्या

नाशिकच्या आधाराश्रमातील कर्णबधिर बालकाला अमेरिकेतील दाम्पत्याने घेतले दत्तक…

सप्टेंबर 16, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यात झाली ही वाढ

सप्टेंबर 16, 2025
Next Post
EoTCyJ6VQAAL0eJ

गुडन्यूज. वर्षारंभीच भारतात येणार २ ते ३ लस; डॉ. रणदीप गुलेरियांची माहिती

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011