- अखिल भारतीय किसान सभेने दिला चलो दिल्लीचा नारा
…..
नाशिक – दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेने चलो दिल्लीचा नारा दिला आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातले हजारो शेतकरी किसान सभेच्या नेतृत्वाखाली वाहन मोर्चाद्वारे दिल्लीला रवाना होणार आहेत. अखिल भारतीय किसान सभेच्या राज्य कार्यकारिणीच्या ऑनलाईन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी २१ डिसेंबरला सकाळी नाशिकहून हे सर्व हजारो शेतकरी दिल्लीकडे कूच करतील. यामध्ये नाशिक, नगर, ठाणे, पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश असेल. या वाहन मोर्चासाठी रविवारपासूनचं हजारो शेतकरी नाशिकमध्ये दाखल होणार आहे. त्यानंतर ते सोमवारी २१ तारखेला दिल्लीकडे कूच करतील असा निर्णय किसान सभेच्या बैठकीत घेण्यात आला आहे.