नाशिक – नाशिक जिल्ह्यातील केंद्रांवर महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० ही परीक्षा घेण्यात आली. सदर परीक्षेकरिता नाशिक शहरामध्ये एकूण ४६ उपकेंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. सदर परीक्षा सकाळचे सत्र आणि दुपारचे सत्र अशा दोन सत्र मध्ये घेण्यात आली. सदर परीक्षेकरिता एकूण १८०७१ विद्यार्थी बसल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
सकाळचे सत्र (सकाळी १० ते १२)
हजर विद्यार्थी – ११८०१
गैरहजर विद्यार्थी – ६२७०
दुपारचे सत्र (दुपारी ३ ते ५)
हजर विद्यार्थी – ११७४८
गैरहजर विद्यार्थी – ६३२३
सदर परीक्षेकरिता एकूण १४६० अधिकारी/ कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते .
सर्व कर्मचारी यांची शासनाचे धोरणानुसार covid-19 rtpcr टेस्ट १७ आणि १८ मार्च रोजी करण्यात आली. सदर टेस्टमध्ये एकूण १६ कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आल्याने त्यांचे जागी राखीव कर्मचारी यांची नियुक्ती केली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे सर्व केंद्रावर covid किट देण्यात आले त्यामध्ये हॅन्ड ग्लोज , masks, sanitizer pouch, फेस शील्ड ,थर्मल स्कॅनर , pulse oxymeter इत्यादी पुरविण्यात आले .सदर परीक्षेकरिता माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली योग्य तो पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता .
नाशिक जिल्ह्यातील सदर परीक्षा जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या मार्गदर्शना नुसार,जिल्हा केंद्र प्रमुख म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी कामकाज पाहिले. नाशिक जिल्ह्यातील आजची परीक्षा यशस्वीरित्या पार पाडण्यात आली. सदर परीक्षेकरिता उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे ,गणेश मिसाळ ,नितीन गावंडे ,तेजस चव्हाण चंद्रशेखर देशमुख ,निलेश श्रेंगी तहसीलदार अशोक नजन ,दीपक पाटील, पल्लवी जगताप, परमेश्वर कासुळे, अनिल दौंडे , नायब तहसीलदार विजय कचवे तसेच फिरके ,श्री पाटील ,योगेश नाईक ,विनोद बागुल इत्यादी कर्मचाऱ्यांनी काम पहिले.