नाशिक – तब्बल १७४ दिवसाने मनमाडहून मुंबईकडे पंचवटी एक्सप्रेस शनिवारी रवाना झाली. पहिल्या दिवशी १५३४ आसनांची क्षमता असलेल्या या विशेष गाडीतून सर्वसाधारण बोगीतून ३२० तर वातानुकूलित बोगीतून ८ प्रवाश्यांनी प्रवास केला.नाशिक जिल्ह्याची जीवनवाहिनी समजली जाणारी मनमाड-मुंबई पंचवटी कोविड स्पेशल एक्स्प्रेस लॉकडाऊन नंतर मोठ्या अंतराने धावली.पहिल्या दिवशी प्रवाशांचा थंड प्रतिसाद मिळाला. आरक्षण करूनच या गाडीने प्रवास करता येणार आहे. त्यामुळे चाकरमान्यांची अडचणही झाली. आरक्षण करून या गाडीने प्रवास करता येणार आहे दोन दिवस अगोदरच आरक्षण करावे लागणार आहे .कोरोना संसर्गापासून बचाव करणारे सर्व उपाय योजना रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे. पंचवटी एक्स्प्रेस सुरू झाल्याने प्रवाशांमध्ये आनंद आहे. मनमाड- नाशिक व नाशिक मुंबई प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठीही विशेष गाडी सुरू करण्याची मागणी होत आहे.