नाशिक : स्वयंसेवी संस्थेच्या कार्यालय आवारातून तस्करांनी दोन चंदनाची झाडे कापून चोरून नेली. ही घटना महामार्गावरील गौळाणे रोड भागात घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरण्या शशिकांत शेट्टी (रा.विसेमळा,कॅनडा कॉर्नर) यांनी तक्रार दाखल केली आहे. शेट्टी यांची शरण नावाची स्वयंसेवी संस्था असून तिचे कार्यालय गौळाणे रोडवरील खतप्रकल्प परिसरात आहे. अज्ञात चंदन तस्करांनी झाडांची रेकी करून बुधवारी (दि.१३) रात्री ती कापून नेली. या कार्यालयाच्या आवारातून दोन झाडांचा गाभा चोरट्यांनी कटरच्या सहाय्याने कापून नेला असून यामुळे चंदन तस्कर पुन्हा सक्रीय झाल्याचे समोर आले आहे. अधिक तपास हवालदार भोजणे करीत आहेत.