वृध्देची सोनसाखळी खेचली
नाशिक : रस्त्याने पायी जाणा-या वृध्द महिलेच्या गळयातील सोनसाखळी दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेली. ही घटना वडाळा पाथर्डी मार्गावरील गजानन महाराज मंदिर परिसरात घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिपश्री विजय मोरे (६१ रा.योगेश्वर कॉलनी महिला बँके जवळ) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. मोरे या शनिवारी (दि.७) रात्री जेवण आटोपून फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडल्या असता ही घटना घडली. गजानन महाराज मंदिर परिसरातून त्या पायी जात असतांना समोरून आलेल्या दुचाकीस्वारांपैकी एकाने त्यांच्या गळयातील सुमारे ४५ हजार रूपये किमतीची सोनसाखळी तोडून पोबारा केला. अधिक तपास उपनिरीक्षक शेख करीत आहेत.

….
महिलेचे मंगळसुत्र खेचले
नाशिक : पतीसमवेत रस्त्याने पायी जाणा-या विवाहीतेच्या गळयातील मंगळसुत्र दुचाकीस्वारांनी ओरबाडून नेले. ही घटना सिडकोतील पवननगर कामटवाडे मार्गावर घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शोभा सतिश चौधरी (रा.अंबिकानगर,कामटवाडे) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. सोमवारी (दि.९) रात्री ही घटना घडली. चौधरी दांम्पत्य कृष्णा साडी सेंटर कडून आपल्या घराकडे पायी जात असतांना समोरून आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांच्या गळयातील सुमारे ९० हजार रूपये किमतीचे सोन्याचे मंगळसुत्र हिसकावून नेले. अधिक तपास उपनिरीक्षक मुळे करीत आहेत.

……
सातपूरला एटीएम फोडण्याचा प्रयत्न
नाशिक : औद्योगीक वसाहतीतील अशोकनगर भागात चोरट्यांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. याघटनेत चोरट्यानी किती रकमेवर डल्ला मारला याबाबत माहिती उपलब्ध होवू शकली नसली तरी याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनंजय भगवान अस्वले (रा.सिन्नरफाटा,ना.रोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. अज्ञात चोरट्यांनी रविवारी (दि.८)अशोक नगर येथील स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. ही बाब दुस-या दिवशी उघडकीस आली. या घटनेत चोरट्यांनी किती रकमेवर डल्ला मारला. याबाबत माहिती उपलब्ध होवू शकली नाही. पोलीस सीसीटिव्ही यंत्रणेच्या माध्यमातून चोरट्यांचा माग काढत असून अधिक तपास उपनिरीक्षक काळे करीत आहेत.

कारमधून मोबाईल चोरी
नाशिक : कारपार्क करून दुकानात खरेदीसाठी गेलेल्या वकिलाचा मोबाईल चोरट्यांनी हातोहात लांबविल्याची घटना नाशिकरोड परिसरातील दत्त मंदिररोड भागात घडली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अॅड. राहूल भातंबरे (रा.जयभवानीरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. भातंबरे गेल्या गुरूवारी (दि.५) दत्तमंदिररोड भागात गेले होते. मोन्जीनीस दुकानासमोर त्यांनी आपली कार पार्क करून दुकानात खरेदी साठी गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांचा कारमधील मोबाईल चोरून नेला. अधिक तपास जमादार काकड करीत आहेत.

…..