नाशिक – सेव्ह द चिल्ड्रन (SC) ने ग्लॅक्सोस्मिथक्लाईन फार्मास्युटिकल्स (जीएसके) सोबत २० सहभागी शाळांमधील WASH चेंज एजंट – स्वच्छता दूतांच्या सन्मानार्थ व्हर्च्युअल संमेलनाचे आयोजन केले होते. यावेळी ३०० हून अधिक स्वच्छतादूतांचा सत्कार करण्यात आला. नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण अधिकारी, सुनिता धनगर; ग्लॅक्सोस्मिथक्लाईन फार्मास्युटिकल्स (जीएसके)चे व्यवस्थापकीय संचालक-भारत श्रीधर वेंकटेश, सेव्ह द चिल्ड्रन’चे कार्यक्रम संचालक अनिन्दीत रॉय चौधरी, सेव्ह द चिल्ड्रन, वेस्ट हबचे उपसंचालक संजय शर्मा यांची विशेष उपस्थिती होती. तसेच सहभागी २० शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग, एसएमसी कर्मचारी, एसएमसी सदस्य, सीबीओ, पालक आणि विद्यार्थ्यांमुळे संमेलन रंगले.
मनुष्यबळ विकास मंत्रालय, भारत सरकारचा स्वच्छ भारत: स्वच्छ विद्यालय उपक्रमाच्या आधारावर नाशिक महानगरपालिका, ग्लॅक्सोस्मिथक्लाईन (जीएसके) फार्मास्युटिकल्स लिमिटेड आणि सेव्ह द चिल्ड्रन’ने संयुक्तपणे २० नाशिक महानगरपालिका शाळांमध्ये “हेल्दी स्कूल एन्व्हायर्नमेंट – राईट ऑफ एव्हरी चाइल्ड” (आरोग्यदायी शालेय वातावरण – प्रत्येक बालकाचा अधिकार) ची अमलबजावणी केली. या प्रकल्पामार्फत उपक्रमात सहभागी २० शाळांमधील १०.६०० बालकांना लाभ होईल. अशा उत्तम स्वच्छतेच्या आणि पिण्याच्या पाण्याच्या बालहितवर्धक सुविधा उभारण्यात आम्ही सक्षम झालो आहोत. मुलांनी स्वच्छतेच्या सवयींचे काटेकोर पालन करावे यासाठी शाळांमध्ये ४०० हून अधिक सत्रांचे आयोजन करण्यात आले. नव्याने २३ युरीनल आणि ९ शौचालयांत सीट बसविल्या, तर २७ युरीनल आणि ११ सीट्सचे नूतनीकरण करण्यात आले. मुलांच्या वयाला साजेशी पाणपोई स्टेशन उभारून ती वापरासाठी खुली करण्यात आली. या टप्प्यात २ स्कूल सॅनीटरी ब्लॉक उभारणे, १९ मुलींची तर २८ मुलांसाठीच्या युरीनलचे नूतनीकरण करणे, शाळांच्या अन्य दुरुस्ती कामांसह दिव्यांगांकरिता एक शौचालय उभारण्याची योजना आहे. ओल्या आणि सुक्या कचऱ्याच्या वर्गीकरणासाठी आम्ही कंपोस्ट कूप बसविण्यासाठी आग्रही आहोत.
या प्रकल्पाचा भाग म्हणून विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यदायी WASH सवयींचे निरीक्षण करणे व त्यांचा प्रचार करण्यासाठी 300 स्वच्छता दूत (आरोग्य योद्धे) प्रशिक्षित करण्यात आले. आपल्या शाळा आणि कुटुंबांमध्ये आरोग्याच्या चांगल्या सवयी रुजविण्याचे, त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम या चेंज एजंटना करायचे होते. शाळांमध्ये शालेय व्यवस्थापन समितीने (एसएमसी) WASH सुविधा सुधारण्यासाठी जबाबदारी घ्यावी हा या प्रकल्पाचा एक उद्देश आहे. एसएमसीद्वारे शालेय विभागाच्या निधीचा वापर करण्यात येत असून, त्याद्वारे शाळेत WASH सुविधा राबविणे, त्यांची देखभाल ही कामे करण्यात येत आहेत. उदाहरणार्थ, शाळांमधील स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेसाठी ७ प्रेशर वॉशिंग मशीनसाठी निधी खर्च करणे. WASH सवयी म्हणजे साबणाने हात स्वच्छ करणे, मासिक पाळीच्या वेळी स्वच्छतेचे व्यवस्थापन इ., विविध चांगल्या सवयी रुजविण्यासाठी संवादात्मक साहित्य तयार करण्यात आले आहे. ज्यामुळे शाश्वत परिणामांसाठी आरोग्यवर्धक सवयी आत्मसात करण्यात येतील.
ग्लॅक्सोस्मिथक्लाईन फार्मास्युटिकल्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक-भारत, श्रीधर वेंकटेश म्हणाले की, आम्ही प्रतिबंधात्मक आरोग्य देखभाल क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी आहोत. शाळांमध्ये स्वच्छतेचा प्रसार करण्यासाठी आमचा सीएसआर उपक्रम वचनबद्ध आहे. आमच्या सेव्ह द चिल्ड्रनसोबतच्या भागीदारीत विद्यार्थी हाच केंद्रबिंदू आहे. चिरस्थायी परिणामांसोबत शाश्वत परिवर्तनाची खातरजमा या माध्यमातून करण्यात येते आहे. बालकांमध्ये वागणुकीसंबंधी बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने स्वच्छता दूत हे केवळ आपापल्या शाळांशी बांधिलकी राखून नाहीत, तर वाड्या-वस्त्यांमध्येही त्यांचा सहभाग आहे. स्वच्छतेच्या बाबतीत काळानुरूप वेगाने बदल घडत आहेत, हा प्रवास अविरत राहिला पाहिजे. विद्यार्थी, प्रशासन आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने स्वयंप्रेरणेने समाजाला सजग करण्याची आवश्यकता आहे, असे आम्हाला वाटते.
महाराष्ट्र शासनाच्या नाशिक महानगर पालिकेच्या शिक्षण अधिकारी सुनिता धनगर म्हणाल्या की, स्वच्छ विद्यालय हा केवळ सरकारी कार्यक्रम म्हणून साकार झाला पाहिजे अशी भूमिका कधीच नव्हती. स्वच्छता ही समाजातील प्रत्येक घटकाची एकत्रित जबाबदारी आहे. या प्रसंगी आपण हातात हात घेऊन एकत्र आलो, तर भारतातील शाळा अस्वच्छ राहण्याचे कारणच उरणार नाही. जीएसके आणि सेव्ह द चिल्ड्रनने आमच्या एनएमसी शाळांमध्ये आरोग्यवर्धक वातावरण रुजावे म्हणून जो पुढाकार घेतला, त्यांनी दाखवलेल्या लवचीक वृत्तीला आणि धैर्यासाठी माझे मन:पूर्वक आभार. या उपक्रमाशी जोडलेला प्रत्येक घटक आमचा साथीदार आहे. सेव्ह द चिल्ड्रनचे आयईसी साहित्य आणि आयोजित केलेल्या सत्रांनी सर्वच सहयोगी घटकांच्या वागणुकीत बदलाचे संकेत दिले आहेत. आमचे विद्यार्थी सदस्य जादू करत आहेत, त्यावर निरीक्षण समिती सदस्यांना सर्वच शाळांमध्ये चांगल्या सवयी रुजत असल्याचे दिसून आले. हे यश टिकून ठेवण्यासाठी आमचा विभाग प्रयत्नशील राहील. जीएसके आणि सेव्ह द चिल्ड्रनतर्फे या सामाजिक कार्याविषयी दाखवलेल्या बांधिलकीला एनएमसी’मधील सर्वच कर्मचाऱ्यांच्या वतीने सलाम.
सेव्ह द चिल्ड्रन’चे कार्यक्रम अधिकारी अनिन्दीत रॉय चौधरी म्हणाले की, अगदी शेवटच्या बालकापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही सेव्ह द चिल्ड्रन’मध्ये वचनबद्ध आहोत. मात्र बालकांच्या सहभागाशिवाय ते शक्य नाही. मुलं स्वत:च प्रेरणादायी असतात. स्वच्छता दूतांनी स्वत:च्या शाळांमध्ये स्वच्छ वातावरण रुजवून ते शक्य करून दाखवले आहे. महासाथीच्या काळात प्रकल्प सुरू राहिला, वाडी-वस्त्यांमध्ये सत्रे राबवली गेली. स्वच्छतेच्या आरोग्यवर्धक सवयी रुजविण्यासाठी विविध घटकांनी सहभाग नोंदवला. केवळ लहान मुलांमध्ये नव्हे, तर त्यांच्या कुटुंबांत, वस्त्यांमध्ये वागणुकीत बदल घडून आल्याने आम्हाला अभिमान वाटतो. नमुना शाळा तयार करण्यात मुलांच्या आणि एनएमसी अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांसाठी मी त्यांचे अभिनंदन करतो. शाळांमध्ये शहरी WASH सवयींचे मापदंड प्रस्थापित होतील याविषयी मला खात्री वाटते.
GSK – ही एक जगातील औषध निर्मिती आणि आरोग्यनिगा क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी
GSK – ही एक जगातील औषध निर्मिती आणि आरोग्यनिगा क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी आहे. लोकांनी भरभरून, चांगले आयुष्य आणि प्रदीर्घ आयुष्य जगावे याकरिता त्यांना गुणवत्तापूर्ण आयुष्य उपलब्ध करून देण्याकरिता ही कंपनी वचनबद्ध आहे. अधिक माहितीसाठी www.gsk-india.com ला भेट द्या.
Save the Children भारतातील २० राज्ये आणि १२० देशांमध्ये कार्यरत
Save the Children भारतातील २० राज्ये आणि १२० देशांमध्ये कार्यरत आहे. ही संघटना शिक्षण, आरोग्य, बचाव आणि मानवी सेवा, आपत्तीव्यवस्थापन; विशेषत: मुलांसाठी या क्षेत्रात काम करते. त्याचप्रमाणे प्रामुख्याने दुर्बल आणि वंचित घटकांच्या गरजांसाठी काम करते. सेव्ह द चिल्ड्रन भारतासोबत ८० वर्षांहून अधिक काळ जोडलेली आहे.