सुधाकर गुजराथी ईपीएस 95 पेन्शनर्स फेडरेशन नाशिक जिल्हाध्यक्षही होते.
नाशिक: ईपीएस ९५ पेन्शनर्स फेडरेशन नाशिक जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर गुजराथी कोरोनाने लोकमान्य हॉस्पिटलमध्ये गेली सात दिवस उपचार घेत होते. आज त्यांचे निधन झाले. ते सेवानिवृत्त एसटी कर्मचारी संघटनाचे राज्य कार्याध्यक्ष होते.
इपीएस ९५ पेन्शनर्स फेडरेशन संस्थापक कॅा. राजू देसले यांनी गुजराथी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. ते म्हणाले की, गुजराथी यांच्या निधनाने नाशिक जिल्ह्यात सेवानिवृत्त पेन्शनर्स कामगारचा लढा देणारे नेतृव हरपले आहे. दोन दिवसांपूर्वी त्याच्याशी बोललो होतो. डॉक्टरांच्या संपर्कात होतो. लढाऊ कामगार नेत्याचा बळी कोरोनाने घेतला आहे. गुजराथी कुटुंबाच्या दुःखात नाशिक जिल्हा ईपीएस पेन्शनर्स फेडरेशन, आयटक महाराष्ट्र सहभागी आहे. गुजराथी साहेब आपण दाखवलेला लढ्याचा मार्गावर कामगार पेन्शन लढा सुरू ठेवू . आपण नाशिक, महाराष्ट्र, सह दिल्ली पर्यन्त सातत्याने आंदोलनचे नेतृव केले ही आठवण विसरू शकणार नाही. कोरोनाशी आपण लढा दिला. आपल्या कार्याला लाल सलाम