बँकेतून बॅट-यांची चोरी
नाशिक : भरदिवसा बँकेतून इन्व्हर्टरच्या सहा बॅट-या चोरून नेल्याची घटना सिडकोतील सिम्बायोसिस कॉलेज परिसरात घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेने बँकेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शेखर दशरथ भदाणे (रा.सदाशिवनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. भदाणे सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या अंबड शाखेचे कर्मचारी आहेत. सिम्बॉयोसिस कॉलेज परिरातील सेंट्रल बँकेत ही घटना घडली. गेल्या सोमवारी (दि.८) दुपारी साडे बाराच्या सुमारास ही चोरी झाली. बँकेत नेहमी प्रमाणे वर्दळ असल्याने चोरट्यांनी एटीएमच्या उघड्या दरवाजात प्रवेश करून कॅबिनमध्ये ठेवलेल्या सुमारे ३० हजार रूपये किमतीच्या सहा बॅट-या चोरून नेल्या. अधिक तपास हवालदार गारले करीत आहेत.
….
पलंगावरून पडल्याने वृध्देचा मृत्यु
नाशिक : झोपेत असतांना पलंगावरून पडल्याने वृध्देचा मृत्यु झाला. ही घटना जेलरोड भागात घडली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. उषा बाळू घोडके (रा.राजलक्ष्मी सोसा.देशमुख भवन मागे) असे मृत वृध्देचे नाव आहे. घोडके या बुधवारी (दि.२४) रात्री बेडरूममध्ये झोपलेल्या असतांना अचानक पलंगावरून पडल्या होत्या. या घटनेत त्यांना गंभीर दुखापत झाल्याने भाचा सोमनाथ खराटे यांनी त्यांना तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार मुसळे करीत आहेत.
……