नाशिक – ९४ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा मान नाशिकला मिळाला आहे. यानिमित्ताने आयोजकांनी घोषवाक्य व बोधचिन्ह स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेसाठी घोषवाक्य मोजक्या शब्दात आणि मराठीतच असणे आवश्यक आहे. बोधचिन्ह एकरंगी, बहुरंगी असावे. १८ जानेवारी २०२१ पर्यंत बोधचिन्ह आणि घोषवाक्य जमा करायचे आहे. कोणीही १८ वर्षांवरील भारतीय नागरिक, व्यक्ती, समूह स्पर्धेत सहभागी होऊ शकतो. चार चौरस सेमीमध्ये चिन्ह बनवायचे आहे. abmss94.nashik@gmail.com या मेल आयडीवर बोधचिन्ह जेपीईजी, जेपीजी, पीएनजी, एसव्हीजी या फॉन्टमध्ये पाठवायचे आहे. स्पर्धकाने स्वत:ची संपुर्ण माहिती फोटोसह मेल करायची आहे. निवड झालेल्या बोधचिन्ह आणि घोषवाक्य यांची संपुर्ण हक्क आयोजकांकडे सुरक्षित असणार आहेत. विजेत्यांना रोख स्वरूपात देण्यात येईल.
काय हवे बोधचिन्ह आणि घोषवाक्यात
प्रत्येक संमेलनाची ओळख प्रथम दर्शनी होते ती त्या संमेलनासाठी केलेल्या बोधचिन्ह आणि घोषवाक्य यांनी. यंदा नाशिक जिल्हा निर्मितीला १५१ वर्षे पूर्ण होत आहे. तेंव्हा गोदेकाठी होत असलेले या संमेलनात शहराचा अभिमान, इतिहास आणि कतृत्त्व थोडक्यात मांडायची संधी या निमित्ताने मिळत आहे. हे सर्व एका बोधचिन्ह आणि घोषवाक्यात उमटावे ही अपेक्षा.