नाशिक – नाशिक येथे होत असलेल्या ९४ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनासाठी कोल्हापूर येथील अनंत गोपाळ खासबारदार यांनी बनविलेल्या बोधचिन्ह आणि घोषवाक्याची निवड करण्यात आली आहे. शनिवारी या बोधचिन्ह आणि घोषवाक्याचे प्रकाशन नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रकाशक समाजाचे सभापती माणिकराव बोरस्ते, सरचिटणीस श्रीमती नीलिमाताई पवार ,संचालक जयंतराव पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
प्रत्येक संमेलनाची ओळख प्रथम दर्शनी होते ती त्या संमेलनासाठी केलेल्या बोधचिन्ह आणि घोषवाक्याने. नाशिक येथे होत असलेल्या ९४ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचेही बोधचिन्ह आणि घोषवाक्य आकर्षक आणि समर्पक असावे ही संपुर्ण शहराची इच्छा होती या निमित्ताने घेण्यात आलेल्या स्पर्धेस राज्यभरातून प्रतिसाद मिळाला. ५३ जणांनी बोधचिन्ह आणि घोषवाक्य बनवून पाठवले. त्यात अनंत गोपाळ खासबारदार यांनी बनविलेल्या बोधचिन्ह आणि घोषवाक्याची निवड करण्यात आली.
या निवड समितीत वास्तूविशारद संजय पाटील, चित्रकार राजेश सावंत, कल्पक योजनाकर आनंद ढाकीफळे, लेखक दत्ता पाटील, लेखक प्राजक्त देशमुख यांनी काम केले.
निवड झालेले बोधचिन्ह, घोषवाक्य आणि विजेत्या कलावंताचा परिचय