नाशिक – सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने अर्थतज्ञ डॉ.विनायक गोविलकर यांचे केंद्रीय अर्थसंकल्प २०२१ या विषयावर विवरण करणारे व्याख्यान गुरुवार, ४ फेब्रुवारी रोजी सायं ६ वा. प.सा.नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आले आहे.
केद्र सरकारने अर्थसंकल्पात दिलेल्या सवलती या खरोखरच नागरिकांपर्यंत पोहचणार का ? सामान्यांना या सवलती कधी मिळणार. कोणत्या बाबी महाग होणार, कोणत्या स्वस्त होणार, त्याच प्रमाणे या अर्थ संकल्पाचा दूरगामी परिणामी काय होणार ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या व्याख्यानातून मिळणार आहेत या व्याख्यानाचा लाभ नाशिककरांनी घ्यावा असे आवाहन कार्यकारी मंडळ सार्वजनिक वाचनालय, नाशिक यांनी केले आहे.