सावरकरनगरला तरूणीचा विनयभंग
नाशिक : मित्राकडे नोट्स घेण्यासाठी गेलेल्या तरूणीस गाठून एकाने विनयभंग केल्याची घटना सावरकरनगर भागात घडली. या घटनेत संशयीताने युवतीच्या मित्रास शिवीगाळ व दमदाटी केली असून याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे संशयीतावर मुंबईनाका पोलीस ठाण्यात यापूर्वीही एक विनयभंगाचा गुन्हा दाखल असून राजकिय पाठबळामुळे त्यास पाठीशी घातले जात असल्याचे बोलले जात आहे.
प्रतिक पवन क्षिरसागर (रा.शरणपूररोड) असे संशयीताचे नाव आहे. पिडीत तरूणीने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयीत तिचा परिचीत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तो तिच्या घराजवळ येवून संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत होता. बुधवारी (दि.२४) तरूणी सावरकरनगर भागात राहणा-या मोहित चव्हाण नामक मित्राच्या घरी नोट्स घेण्यासाठी गेली असता ही घटना घडली. संशयीताने तिचा पाठलाग करून विनयभंग केला. यावेळी त्याने पीडितेचा मित्र चव्हाण यास शिवीगाळ करीत दमदाटी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक परदेशी करीत आहेत.
…..