सातपूरला कंपनीत चोरी
नाशिक: कंपनीतील कार्यालयात घुसून अज्ञात चोरट्याने कागदपत्रे व मोटार पळवल्याची घटना सातपूर औद्योगिक वसाहतीत घडली. याप्रकरणी जितेंद्र दिवाकर ओगले (रा. अशोकनगर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ३० नोव्हेंबरच्या रात्री ही घटना घडली. ओगले यांच्या कंपनीतून अज्ञात चोरट्याने खरेदी बिलाची फाईल, आवक-जावक रजिस्टर, पाच हजार रुपये किंमतीची मोटार असा एकूण १६ हजार ५०० रुपयांचा माल चोरून नेला. याप्रकरणी हवालदार भामरे तपास करत आहे. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपनगरमध्ये दुचाकी चोरी
नाशिक : भाजीपाला खरेदी करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीची ऍक्टिवा चोरीला गेल्याचा प्रकार उपनगर परिसरता घडला.
याप्रकरणी शिवाजी पुंजा कोठूळे (रा. विहीतगाव) यांनी उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. २३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास कोठूळे हे भाजीपाला खरेदीसाठी सोमवार आठवडे बाजारात गेले होते. यावेळी त्यांची मोटारसायलक क्र. (एमएच १५ जीक्यु ९६२५) अज्ञाच चोरट्याने चोरून नेली.
बांधकामावरून पडून मजुराचा मृत्यू
नाशिक : सेंट्रींगचे काम सुरू असताना तिसर्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना जेलरोड येथे मंगळवार (दि. १) सायंकाळी घडली. राजू पटेल (नाव व पत्ता माहित नाही) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी संतोश देवराम आंधळे (रा. मोरवाडी) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास शिवरामनगर, जेलरोड येथील साईटवर बिल्डींग काम सुरू होते. यावेळी राजू पटेल हा सेंटरींगचा लाफा घेण्यासाठी तिसर्या मजल्यावर गेला असता पाय घसरल्याने लिफ्टच्या मोकळ्या जागेतून तो खाली पडला व डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी त्यास बिटको हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. याप्रकरणी ठेकेदाराने सुरक्षेसाठी कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना न केल्याने उपनगर पोलीस ठाण्यात ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोरेवाडीत घरफोडी
नाशिक : कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करत कपाटातील ३४ हजार रुपये किंमतीचे दागीने चोरून नेल्याचा प्रकार गोरेवाडी परिसरात घडला. याप्रकरणी रामेश्वर भगवान येडके (रा. गोरेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत घरी कोणी नसतांना अज्ञात चोरट्याने कडी-कोयंडा तोडून येडके यांच्या घरात प्रवेश केला व लोखंडी कपाटात ठेवलेले पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, दोन गॅ्रम वजनाचे ओम पान व दहा हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण ३४ हजार रुपयांचा माल चोरून नेला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२० हजाराचे दागिणे लंपास
नाशिक : बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने २० हजार रुपयांचे दागीने चोरून नेल्याची घटना सदगुरु नगर, नाशिकरोड परिसरात घडली. याप्रकरणी सिमा सोपान बारी यांनी उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बारी कुटुंब १८ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२० दरम्यान जालना येथे गेले असतांना अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून घरात प्रवेश केला. व बेडरुममधील कपाटात ठेवलेल्या दोन सोन्याच्या अंगठ्या, ओमपान, चांदीची वाटी व चमच्या, तीन समई व रोख रक्कम असा एकूण २० हजार रुपये किंमतीचा माल चोरून नेला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.