कोरोना पॉझिटीव्ह अपडेट्स सकाळी ११ वाजेपर्यंत
नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १ लाख ५२ हजार ४८७ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत २६ हजार ६४३ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत २ हजार ३९२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे. जिल्ह्यात नाशिक शहरात १६ हजार ८४ तर जिल्ह्यातील तालुक्यात निफाड तालुक्यात १ हजार ४११ सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ५५१, चांदवड ६५१, सिन्नर ५९८, दिंडोरी ५३२, निफाड १ हजार ४११, देवळा ९०१ , नांदगांव ७२६, येवला ५७६, त्र्यंबकेश्वर १६४, सुरगाणा ११७, पेठ ५६, कळवण १९३, बागलाण ९७९, इगतपुरी ३४७, मालेगांव ग्रामीण ८०९ असे एकूण ८ हजार ६११ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १६ हजार ०८४, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ७२२ तर जिल्ह्याबाहेरील २२६ असे एकूण २६ हजार ६४३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात १ लाख ८१ हजार ५२२ रुग्ण आढळून आले आहेत.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ८२.९५ टक्के, नाशिक शहरात ८४.९२ टक्के, मालेगाव मध्ये ७७.८२ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८७.४९ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८४.०० इतके आहे.
मृत्यु :
नाशिक ग्रामीण ९७१ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १ हजार १४८, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून २०३ व जिल्हा बाहेरील ७० अशा एकूण २ हजार ३९२ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
लक्षणीय :
– १ लाख ८१ हजार ५२२ कोरोनाबाधित रुग्णांपैकी १ लाख ५२ हजार ४८७ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.
– सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले २६ हजार ०५८ पॉझिटिव्ह रुग्ण.
– जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८४.०० टक्के
– जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट ३१.२५ टक्के
(वरील आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)