नाशिक रोड – नाशिकरोड परिसरातील सराफ व्यावसायिक व नागरिकांची ओळख करून त्यांचा विश्वास संपादन करून सुमारे ४५ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या उपनगर पोलिसांनी उत्तर प्रदेश येथील मथुरा येथून अटक केली असून त्याच्याकडून सुमारे २८ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
दिनेश कुमार रामाधर मित्रा असे संशयित आरोपीचे नाव असून सदर आरोपी हा काही महिन्यापूर्वी नाशिकरोड परिसरातील जेलरोड येथे राहत होता, त्याने सुरुवातीला परिसरातील नागरिकांची ओळख करून घेतली व विश्वास संपादन केला.तसेच विविध सोनाराच्या दुकानांमधून रोख पैशाने सोने खरेदी करून त्यांचाही विश्वास संपादन केला, तसेच अख्तर मुजिर मोडल या व्यक्ती बरोबर ओळख करून सोने घडविण्याचे तुला काम देतो, असे अमिष दाखवून ४३६ ग्रम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख पाच लाख घेतले, त्या प्रमाणे अष्टेकर ज्वेलर्स येथून ११८ ग्रम वजनाचे दागिने घेऊन नंतर पैसे देतो असे सांगितले. त्याच प्रमाणे अनेक बेरोजगाराना नोकरी चे आमिष दाखवून पैसे उकळले. या कामी त्याला पत्नी माधुरी मिश्रा हिने साथ दिली. त्या नंतर मोबाईल व बँक खाते बंद करूनतसेच मुलाच्या शाळेचे दाखले घेऊन सदर व्यक्ती हा नाशिकरोड येथून पसार झाला. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता.
उपनगर पोलीस या गुन्ह्याचा तपास करीत असताना आरोपी चे मुले हे गुजरात मध्ये शिकत असल्याचे समजले. त्या नंतर उपनगर पोलिसांनी गुजरात गाठले,मात्र त्याला पोलिसांचा सुगावा लागताच त्याने तेथून पळ काढला. उत्तर प्रदेश मथुरा या ठिकाणी पळाला, पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी त्याचा मोबाईल नंबर मिळवत मथुरा शहर गाठले व मोठ्या शिताफीने त्याला ताब्यात घेतले.त्याची झडती घेतली असता त्याच्या कडून पंधरा लाख किमतीचे ३०० ग्रम सोन्याचे दागिने, रोख रक्कम ८,४०,०००व त्याच्या बँकेच्या खात्यात असलेले ४,५०,००० रक्कम गोठवले.असा सुमारे २७,९०,००० जप्त करण्यात आले आहे.
पोलीस आयुक्त दीपक पांडये यांच्या आदेशानुसार व पोलीस उपायुक्त विजय खरात, सह्ययक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलीस उपनिरीक्षक विकास लोंढे, पोलीस हवालदार विनोद लखन, निलेश जगताप, नसीर शेख आदी नी ही कामगिरी केली, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विकास लोंढे करीत आहे. दरम्यान या बाबत पोलीस उपआयुक्त विजय खरात यांनी उपनगर पोलीस ठाण्यात पत्रकार परिषदेत माहिती दिली.