गुरूवार, ऑक्टोबर 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाशिक – सराफ दुकानात दोन महिलांनी काऊंटरची काच उचकून सोन्याचा नेकलेस लांबवला

डिसेंबर 22, 2020 | 11:06 am
in क्राईम डायरी
0
crime diary 2

सराफ दुकानात दोन महिलांनी काऊंटरची काच उचकून सोन्याचा नेकलेस लांबवला
नाशिक : अलंकार खरेदीच्या बहाण्याने दुकानात शिरलेल्या भामट्या महिलांनी काऊंटरची काच उचकून लाखाचा सोन्याचा नेकलेस चोरून नेल्याची घटना सराफ बाजारात घडली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून चोरट्या महिलांचा शोध घेत आहेत.
राजेंद्र शामराव ओढेकर (रा.तिळभांडेश्वर लेन) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. ओढकर यांचे सराफ बाजारात ओढकर ज्वेलर्स नावाचे सराफी दुकान आहे. रविवारी (दि.२०) दुपारच्या सुमारास दोन अनोळखी महिला दागिणे खरेदीसाठी दुकानात शिरल्या होत्या. कामगार अलंकार दाखवित असतांना संशयीत महिलांनी कामगाराचे लक्ष विचलीत करून ही चोरी केली. अज्ञात भामट्या महिलांना नोकरांचे लक्ष नसल्याची संधी साधून काऊंटरच्या शोकेसची काच सरकवून त्यातून सुमारे ९० हजार रूपये किमतीचा सोन्याचा नेकलेस हातोहात लांबविला. अधिक तपास हवालदार कोल्हे करीत आहेत.

…..
गंजमाळला तुंबळ हाणामारी चार जखमी
नाशिक : गंजमाळ येथील श्रमिकनगर भागात पूर्ववैमनस्यातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या घटनेत चार जण जखमी झाले असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात परस्परोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
योगेश धुराजी हिवाळे (रा.सहकारनगर,भिमवाडी) याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, रविवारी (दि.२०) रात्री जावेद पठाण याच्या समवेत सिगारेट घेण्यासाठी श्रमिकनगर भागात गेलो असता,जावेद पठाण,गफार हसन शहा उर्फ पाप्या,सोनू शेख,सरजीन शेख,शाहरूख शेख,इम्रान तसेच दीपक पाटील (रा.सर्व श्रमिकनगर) आदींच्या टोळक्याने गोळया बिस्कीटांच्या दुकानासमोर गाठून शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली. यावेळी गफार उर्फ पाप्या शहा याने फायटर तोंडावर मारल्याने हिवाळे याचे दात तुटले आहेत. तर गफार हसन शहा याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, योगेश हिवाळे,नितीन हिवाळे,भिन्या,सर्जा व मिनाबाई मोरे व त्यांचे दोन साथीदार (रा.सर्व भिमवाडी) आदींनी गैरकायद्याची मंडळी जमवीत आपल्यासह दीपक पाटील व मित्र जावेद यास शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी मारहाण केली. या घटनेत लोखंडी रॉडचा वापर करण्यात आल्याने तीघे मित्र जखमी झाले असून त्यांना संशयीत टोळक्याने जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक एस.एस.व-हाडे करीत आहेत.

…….
दोन दुचाकींची चोरी
नाशिक : शहरात वाहनचोरीची मालिका सुरूच असून नुकत्याच दोन मोटारसायकली चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी सरकारवाडा आणि भद्रकाली पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सिडकोतील पवननगर भागात राहणारे प्रशांत विभाकर विरमलवार (रा.इफको कॉलनी) गेल्या मंगळवारी (दि.१५) जिल्हा रूग्णालयात गेले होते. पार्किंगमध्ये लावलेली त्यांची पॅशन (एमएच १५ जीएन ८८४९) मोटारसायकल चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार म्हसदे करीत आहेत. दुसरी घटना जुने नाशिक भागात घडली. मधली होळी चौकात राहणारे हेमंत ताराचंद गायकवाड (रा.गजराज चौक) यांची मेस्ट्रो मोपेड (एमएच १५ ई डब्ल्यू ४२३२) गेल्या शुक्रवारी (दि.११) रात्री परिसरातील रेणूका दुकानासमोर पार्क केलेली असतांनाच चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार पाळदे करीत आहेत.

…….
बीडी न दिल्याने एकास मारहाण
नाशिक : बिडी न दिल्याने एकाने ५२ वर्षीय इसमास काठीने बेदम मारहाण केल्याची घटना सीबीएस परिसरातील सहकार भवन लॉज परिसरात घडली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाना देवमन आहिरे (रा.गांधीचौक,कळवण) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. आहिरे बुधवारी (दि.२३) रात्री नेहमी प्रमाणे आंबेडकर पुतळय़ा जवळ बसण्यासाठी गेले असता ही घटना घडली. वीडी ओढत असतांना अत्तार शेख नामक इसमाने त्यांना गाठले. यावेळी संशयीताने त्यांच्याकडे बिडीची मागणी केली. मात्र आहिरे यांनी बिडी देण्यास नकार दिल्याने अत्तार शेख याने शिवीगाळ करीत लाकडी काठीने त्यांना बेदम मारहाण केली. या घटनेत आहिरे यांच्या उजव्या पायास दुखापत झाली असून अधिक तपास हवालदार पाटील करीत आहेत.
……….
दोन घरफोडीत दीड लाखाचे दागिणे लंपास
नाशिक : शहर परिसरात घरफोडीचे सत्र सुरूच असून वेगवेगळया भागात झालेल्या दोन घरफोडीत चोरट्यांनी सुमारे १ लाख ६५ हजाराच्या दागिण्यांवर डल्ला मारला. याप्रकरणी नाशिकरोड आणि अंबड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सौभाग्यनगर येथील मिनाक्षी फकिरराव कासार (रा.नित्यानंद बंगला) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कासार कुटुंबीय .१९ ते २१ डिसेंबर दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद बंगल्याचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटातून १ लाख ३४ हजार रूपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिणे चोरून नेले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शेळके करीत आहेत. दुसरी घटना सिडकोतील शिवशक्ती चौकात घडली. गोपाळ कोंडीबा पाटील (रा.नवजीवन डे स्कूल जवळ,शिवशक्तीचौक) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पाटील कुटुंबीय दि.१८ ते २० डिसेंबर दरम्यान बाहेर गावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून हॉलमधील लोखंडी कपाटातून सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ३१ हजार ६०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक संगम करीत आहेत.
………….
अपघातात तीन दुचाकीस्वार ठार
नाशिक : शहर परिसरात वेगवेगळय़ा भागात झालेल्या अपघातात तीन दुचाकीस्वार ठार झाले. त्यात एका कामगाराचा समावेश असून,एका अपघात भरधाव बोलेरोने तर दोन अपघात पिकअपने धडक दिल्याने दुचाकीस्वारांना आपला प्राण गमवावा लागला आहे. याप्रकरणी म्हसरूळ,नाशिकरोड आणि सातपूर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
सातपूर औद्योगीक वसाहतीतील शान कार्स या शो रूममधील कामगार अविनाश रमेश पगारे (२६ रा.उमराळे बु.ता.दिंडोरी) हा युवक सोमवारी (दि.२१) सायंकाळी काम आटोपून आपल्या घरी जात असतांना अपघातात ठार झाला. एमएच १५ जीके ५५८३ या दुचाकीने तो पेठरोडने उमराळे गावाकडे प्रवास करीत असतांना मखमलाबाद शिवारातील इंद्रप्रस्थनगर येथील पिंगळे फार्म समोर विरूध्द दिशेने येणा-या एमएच १३ ए एक्स ८५२२ या बोलेरो जीपने दुचाकीस धडक दिली. या अपघातात अविनाश पगारे ठार झाला. याप्रकरणी त्याचे काका सम्राट पगारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून बोलेरो चालक राजू धोंडीबा भुसनर (रा.हाटकर मांगेवाडी,जि.सोलापूर) याच्याविरूध्द म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक अहिरे करीत आहेत. दुसरी घटना नाशिक पुणा मार्गावरील पळसे शिवारात घडली. या अपघातात बाळासाहेब श्रीहरी सातपुते (४२ रा.जाधव संकुल पळसे मुळ रा.भेंडाळी ता.सिन्नर) हे दुचाकीस्वार ठार झाले. बाळासाहेब सातपुते रविवारी (दि.२०) नाशिक पुणा मार्गावरील बंगाली बाबा स्टॉप कडून पळसे गावात जाण्यासाठी दुचाकीने एमएच १५ बीटी ६२३२ प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. विसावा हॉटेल परिसरात पाठीमागून भरधाव आलेल्या पिकअपने (एमएच १७ टी ३८९१) दुचाकीस धडक दिली. या अपघातात सातपुते गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी शुभम पाळदे यांच्या तक्रारीवरून पिकअप चालकाविरूध्द नाशिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक माळी करीत आहेत. तिसरा अपघात सातपूर औद्योगीक वसाहतीतील श्रमीकनगर येथील समृध्दी नगर भागात झाला. या अपघातात अजय विजय मनोहर (२३ रा.तळेगाव ता.इगतपुरी) हा तरूण ठार झाला. अजय मनोहर हा युवक सोमवारी (दि.२१) औद्योगीक वसाहतीतील समृध्दी नगर भागातून आपल्या दुचाकीवर एमएच १५ एच डी २९९८ प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. अशोकनगर कडून समृध्दीनगरच्या दिशेने भरधाव येणाºया पिक अपने ( एमएच १५ इजी ६१२७) दुचाकीस समोरून धडक दिली. या अपघातात अजय मनोहर ठार झाला. याप्रकरणी वडिल विजय मनोहर यांनी दिलेल्या तक्रारीवरून सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक काळे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कांदा साठवणूक क्षमता व निर्यात खुली करण्याची खा.डॉ.भारती पवार यांची केंद्राकडे मागणी

Next Post

हरमन बवेजाचा हेल्थ कोच साशा सोबत साखरपुडा

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

महत्त्वाच्या बातम्या

केंद्राचे गिफ्ट! महाराष्ट्रात होणार हे दोन रेल्वेमार्ग

ऑक्टोबर 8, 2025
FB IMG 1755619676395 1024x634 1
महत्त्वाच्या बातम्या

असे आहे पॅकेज… शेतकऱ्यांना मिळणार एवढे पैसे, या सवलती… जाणून घ्या सविस्तर…

ऑक्टोबर 8, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
महत्त्वाच्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे निर्णय

ऑक्टोबर 8, 2025
Untitled 31
मुख्य बातमी

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी इतक्या हजार कोटींचे पॅकेज

ऑक्टोबर 8, 2025
AirAsia e1678528968685
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीच्या सणात विमान तिकीट दर वाढणार?

ऑक्टोबर 6, 2025
aadhar
महत्त्वाच्या बातम्या

लहान मुलांच्या आधार नोंदणीबाबत नवी घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
DRI1JPGDBUG
महत्त्वाच्या बातम्या

“ऑपरेशन डिजीस्क्रॅप” अंतर्गत झाली ही मोठी कारवाई

ऑक्टोबर 6, 2025
M 1024x768 1
महत्त्वाच्या बातम्या

साखर कारखान्यांबाबत अमित शाह यांनी केली ही घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
Next Post
Epr1BrSUUAATqnz

हरमन बवेजाचा हेल्थ कोच साशा सोबत साखरपुडा

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011