नाशिक – नाशिक श्री संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानच्या विश्वस्तांच्या नऊ जागांसाठी तब्बल १८७ जणांनी अर्ज केले आहेत. या इच्छुक उमेदवारांच्या २८ डिसेंबर २०२० ते १२ जानेवारी २०२१ दरम्यान मुलाखती घेण्यात येणार आहे. वारकरी भाविकांचे श्रद्धास्थान असणा-या श्री संत निवृत्तीनाथ महाराज समाधि संस्थांच्या विश्वस्त पदाच्या नऊ जागा भरण्याचा अधिकार धर्मादाय उपायुक्त नाशिक यांना आहेत. विद्यमान विश्वस्त त्यांची मुदत संपल्याने उपायुक्त कांचनगंगा सुपाते जाधव यांनी नियुक्तीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार विश्वस्त पदासाठी अर्ज करण्याची मुदत १७ डिसेंबर रोजी संपुष्टात आली. मुदती अखेर जिल्हाभरातील १८७ इच्छूकांनी अर्ज दाखल केले. या सर्व व उमेदवारांच्या मुलाखती घेऊन निवड जाहीर करण्यात येणार आहे. दररोज सुमारे पंधरा उमेदवारांच्या मुलाखती होणार असून दिनांक २८ डिसेंबर २०२० ते दिनांक १२ जानेवारी २०२१ यादरम्यान मुलाखती होतील. याबाबत ची यादी आजच धर्मादाय उपायुक्त याच्या सूचनाफलकावर प्रकाशित करण्यात आली आहे.