- दिल्ली आंदोलनातील शहीद शेतक-यांना श्रध्दांजली
- नाशिक येथून ५००० शेतकरी किसान सभेचे २१ तारखेला दिल्ली येथे रवाना होणार
- २२ तारखेला मुंबईत रिलायन्स कंपनीच्या विरोधात आंदोलन
- नाशिक: दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी कायद्याविरोधी आंदोलनात ४० च्यावर शेतकरी शहीद झाले असून या शहीद शेतक-यांना नाशिक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळया समोर श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. या सभेस मार्गदर्शन करताना दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनची माहिती जनआंदोलनच्या राष्ट्रीय नेत्या मेधा पाटकर यांनी सांगितले की, २१ तारखेला नाशिक येथून किसान सभेचे ५००० शेतकरी दिल्ली येथे आंदोलनात सहभागी होण्यासाठी जाणार आहे. त्याचप्रमाणे २२ तारखेला मुंबईत रिलायन्स कंपनीच्या मालकाच्या घरावर आंदोलन करणार आहे. यावेळी त्यांनी केंद्र सरकावर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या की, केंद्र सरकार आंदोलन बदनाम करत आहे.
या प्रसंगी नगरसेवक गुरुमित बग्गा, योगेश कापसे, संजय मंगु, किरण मोहिते आदींनी मनोगत व्यक्त केले. समारोप किसान सभा राज्यसचिव राजू देसले यांनी केला. यावेळी देसले म्हणाले की, बळीराजाला साथ द्या, दिल्ली शेतकरी आंदोलन समर्थनार्थ विविध उपक्रम ,आंदोलन करण्याचे आवाहन केले. सोमवारी नाशिक येथून दिल्ली येथे जाणाऱ्या जत्थ्याला पाठिंबा देण्यासाठी मोठया संख्येने उपस्थित राहावे. तसेच रिलायन्स वरती २२ डिसेंबर रोजी मुंबई येथे होणाऱ्या आंदोलनांसाठी नंदुरबार येथून नाशिक येथे तीन हजार शेतक-यांचा जत्था लोकसंघर्षच्या प्रतिभा शिंदे नाशिक येथे ६ वा येणार आहेत. त्या जत्थ्याचे स्वागत करण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन केले. सूत्रसंचालन व प्रास्ताविक जनआंदोलनच्या राज्य समन्वयक अनिता पगारे यांनी केले. या प्रसंगी अॅड. प्रभाकर वायचले, अॅड. शरद कोकोटे, पद्माकर इंगळे, अभिजित गोसावी, गिरीश उगले पाटील, सचिन मालेगावकर, मुकुंद दीक्षित, संविधान गायकवाड, आसिफ शेख, युसूफ जकरणी, संतोष जाधव, स्वप्नील घिया, खालसा, विनायक येवले, आर, भोंग, स्वाती त्रिभुवन, कल्याणी अनिता, सुगंध बरंट, तलाहा शेख, आदी परिवर्तन वादी पक्ष संघटना संस्था उपस्थित होते. यावेळी शहीद शेतकऱ्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली