नाशिक : शिवीगाळ व दमदाटी करत हवेत गोळीबार केल्याप्रकरणी संशयितावर उपनगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. १९) सकाळी वडनर दुमला येथे घडली. संतोष प्रकाश निसाळ (रा. शिंगवेबहुला) असे गोळीबार करणार्या संशयितांचे नाव असून पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी भास्कर वामन पोरजे (रा. वडनेर दुमाला, गोविंदनगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास फिर्यादी भास्कर पोरजे यांचा भाचा संशयित संतोष निसाळ हा त्यांच्या घराजवळ आला व दमटाटी व शिवीगाळ करून त्यांच्याकडील पिस्टलमधून एक राऊंड हवेत फायर केला. याप्रकरणी पोलिसांनी रविवारी संशयितास अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक बटूळे तपास करत आहे.
…..