नाशिक – राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत आज नाशिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालया संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी सुरज मांढरे, मनपा आयुक्त कैलास जाधव, अधीक्षक अभियंता शरद राजभोज, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव कालिदास चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, प्रांताधिकारी पी.एस.मीना,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रत्ना रावखंडे, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे समन्वयक अधिकारी डॉ.संदीप गुंडरे,मनपा आरोग्य अधिकारी नागरगोजे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.