नाशिक – शासकीय पुर्ननियुक्त माजी सैनिक संघटना, महाराष्ट्र राज्य (नाशिक जिल्हा) यांचे वतीने ७ डिसेंबर राष्ट्रीय सशस्त्र झेंडा दिवसाच्या निमीत्ताने रविवार ६ डिसेंबर २०२० रोजी सकाळी १० वाजेपासून दुपारी ३ वाजेपर्यंत नाशिक रोड येथील कदम लॉन्स येथे जयराम हॉस्पिटल, ब्लड स्टोरेज सेंटरच्या सौजन्याने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे. शासकीय पुर्ननियुक्त माजी सैनिक संघटना, नाशिक जिल्हा कार्यकारिणी सर्व पदाधिकारी व सभासदांनी परिसरातील सर्व माजी सैनिकांना, राज्य शासकीय सेवेतील विविध विभागात कार्यरत असलेले अधिकारी व कर्मचारी तसेच सामाजिक बांधिलकीची जाणीव असलेल्या विविध स्तरातील दानशूर व्यक्तींना शिबीरात उपस्थित होऊन रक्तदान करण्याचे आवाहन शासकीय पुर्ननियुक्त माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष – सुनील पवार, उपाध्यक्ष शशिकांत पाटील, सचिव ज्ञानेश्वर पगार, सहसचिव श्याम राठोड, कोषाध्यक्ष राहुल कडलग, समन्वयक संतोष पवार, संघटक संजय बोरसे, यांनी केले आहे.