नाशिक – नुकतेच नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ व नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाची बैठक शिक्षण उपसंचालक माननीय नितीन उपासनी यांच्या सोबत पार पडली. या बैठकीत शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षणास तूर्त स्थगिती मिळाल्याचे जिल्हा मुख्याध्यापक संघ व नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या पदाधिका-यांनी सांगितले.
या मागणीसाठी नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ व माध्यमिक शिक्षक संघ यांनी शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांच्याकडे यनिवेदन दिले .या निवेदना म्हटले आहे की, शासनाने १ मार्च ते १० मार्च २०२१ या कालावधीत शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षण करण्यासाठी आदेशित केले आहे. परंतु महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात covid-19 या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र शासनाने त्याबाबत उपाय योजना राबवण्यासाठी उपाय योजना सुरू केली आहे. जिल्ह्यामध्ये लॉकडाउन देखील सुरू झालेले आहे. नाशिक शहर व ग्रामीण भागातही रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असून पालकांनी देखील या सर्वेक्षणासाठी विरोध दर्शविला आहे. काही शिक्षकाचे करोना आजारामुळे दुःखद निधन झालेले आहे. शासनाने देखील या मोहिमेला स्थगिती दिली आहे. सध्या इयत्ता दहावी व बारावीचे वर्ग सुरू असून त्यांच्या अध्यापनाचे व शालांत परीक्षेची पूर्वतयारी कामकाज महत्त्वाचे असून या परिस्थितीत शिक्षकांना बाहेर पाठविणे जोखमीचे व विद्यार्थी हिताचे नाही. त्यामुळे या मोहिमेस तूर्त स्थगिती मिळावी. तसेच कडक उन्हाळा असल्याने शाळा सकाळच्या सत्रात सुरु कराव्या. या मुख्याध्यापक संघ व माध्यमिक शिक्षक संघ यांच्या मागणीनंतर शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी एक मार्चपासून सर्व शाळासकाळी करण्यात याव्यात असे आदेश नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाला उपसंचालक यांनी संघाच्या पदाधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील माध्यमिक उच्च माध्यमिक सर्व शाळा सकाळच्या करण्यास हरकत नसल्याचे मुख्याध्यपक संघाने सांगितले.
यावेळी मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख, उपाध्यक्ष . प्रदिप सांगळे, बी. डी.गांगुर्डे, एम.व्ही. बच्छाव बी.के.सानप .किशोर पालखेडकर, डी. टी. निंबेकर, देसले एस. के.पानपाटिल, पी. एस. बाबासाहेब खरोटे प्रदीप धुळे शहर माध्य. शिक्षक संघाचे कार्यवाह नागरे, बी .के माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत कुशारे निफाडचे अध्यक्ष संजय गिते . मच्छिंद्र सांगळे दशरथ गोडसे सचिन दिवे , नवनाथ वाकचौरे, रघुनाथ एरंडे मच्छिंद्र नवले मार्कड टी. डी. यांचे सह मुख्याध्यापक संघ, माध्यमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते .