नाशिक – संयुक्त किसान मोर्चा वतीने २६ जानेवारी रोजी दिल्लीत लाल किल्यावर भाजप केंद्र सरकार पुरस्कृत कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला त्याचा निषेध करण्यासाठी व दिल्लीत लढणाऱ्या शेतकरी आंदोलनला पाठिंबा देण्यासाठी देशभर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण आयोजित करण्यात आले. नाशिक येथेही हे उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आल्याची माहिती संयुक्त किसान मोर्चातर्फे देण्यात आली.
या आंदोलनाच्या वेळी केंद्र सरकारने कितीही षडयंत्र केले तरी शेतक-यांचे आंदोलन हे कायदे रद्द होईपर्यंत व हमीभावचा कायदा होईपर्यंत संपणार नाही. तरी अधिक संघटितपणे समाजातील सर्वस्तराना सोबत घेऊन सुरु राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
उपोषणस्थळी जेष्ठ साहित्यीक उत्तम कांबळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा नाशिक जिल्ह्याच्यावतीने राजू देसले, सुनील मालुसरे, शरद आहेर, रंजन ठाकरे,डॉ डी एल कराड, अनिता पगारे, महादेव खुडे, व्ही डी धनवटे, विजय दराडे, विजय पाटील, नाना बच्छाव,किरण मोहिते, समाधान बागुल, आसिफ सर, शांताराम चव्हाण,धोत्रे प्रभाकर वायचळे, बबलू खैरे, नाझीम काझी, निशिकांत पगारे, जगदीश पवार,भास्कर शिंदे, देविदास बोपळे, नामदेव बोराडे, पद्माकर इंगळे, मधुकर मुठाल, राम निकम, डॉ शोभा बच्छाव, डॉ हेमलता पाटील, मुकुंद रानडे, तानाजी जायभावे, कृष्णा शिंदे, अपूर्व इंगळे, संतोष काकडे, उपस्थित होते