दोन जुगार अड्डे उदध्वस्त १४ जुगारी जेरबंद
नाशिक : शहर व परिसरातील वेगवेगळया भागात छापे टाकून दोन जुगार अड्डे उदध्वस्त केले. या कारवाईत अड्डा चालकांसह १४ जुगारींना बेड्या ठोकण्यात आल्या असून त्यांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य असा सुमारे ३० हजाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी गंगापूर आणि म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
संतकबीरनगर येथील भोसला स्कूल जवळील साई वरद सोसायटीच्या बाजूला असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती गंगापूर पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार बुधवारी (दि.१०) दुपारच्या सुमारास पोलीसांनी छापा टाकला असता अश्रुबा रेशमाजी साळवे (५०) हा अन्य चार साथीदारांसह जुगार खेळतांना व खेळवितांना मिळून आला. या अड्यावर रोकडसह जुगाराचे साहित्य असा सुमारे ९ हजार ६४० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून याप्रकरणी पोलीस शिपाई घनशाम भोये यांच्या तक्रारीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार बोळे करीत आहेत. दुसरी घटना म्हसरूळ शिवारात उघडकीस आली. पेठरोडवरील मेघराज बेकरी शेजारी असलेल्या पत्र्याच्या बंद रूममध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकास मिळाली होती. त्यानुसार बुधवारी (दि.१०) पोलीसांनी छापा टाकला असता राहूल कमलाकर लोखंडे (३१,लक्ष्मणनगर) हा अन्य आठ साथीदारांसह कल्याण नावाचा जुगार खेळतांना व खेळवितांना मिळून आला. संशयीतांना बेड्या ठोकत पोलीसांनी घटनास्थळावरून रोकडसह जुगाराचे साहित्य असा १८ हजार ४५० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून याप्रकरणी पोलीस नाईक मोतीराम चव्हाण यांच्या तक्रारीवरून म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक चतुर करीत आहेत.
……
सिडकोत एफडीएचे छापे
दोन पान स्टॉलमधील गुटखा जप्त
नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्यात बंदी असलेला गुटखा विक्रीचा प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. यापार्श्वभूमिवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला असून, सिडकोतील दोन पान स्टॉलची झडती घेत बेकायदा गुटखा हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून दोन विक्रेत्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
भगवान हरिभाऊ बोराटे (रा.शिवाजीचौक,सिडको) व प्रशांत धनलाल गवळे (रा.लक्ष्मीनगर,अंबड) अशी अटक करण्यात आलेल्या गुटखा विक्रेत्यांची नावे आहेत. बोराटे यांचे शिवाजी चौकात लक्ष्मी पान मंदिर तर गवळे यांचे दिव्या अॅड लॅब समोर श्रीकृष्ण पान स्टॉल नावाचे दुकान आहे.अन्न सुरक्षा अधिकारी राजेंद्र सुर्यवंशी यांच्या पथकाने ही कारवाई केली. शहर परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे जिल्हाप्रशासनाच्या वतीने खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहे. महापालिका आणि पोलीसांच्या वतीने विना मास्क व रस्त्यावर थुंकणाºयांवर कठोर कारवाई केली जात आहे. या पार्श्वभूमिवर एफडीएने कारवाईचा बडगा उगारला असून ठिकठिकाणच्या विक्रेत्यांवर कारवाई केली जात आहे. सुर्यवंशी यांच्या पथकाने मंगळवारी (दि.९) दुपारच्या सुमारास सिडको परिसरातील दुकानांची झडती घेतली. त्यात दोघा संशयीतांच्या दुकानात विक्रीस बंदी असलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ मिळून आला. या कारवाईत दोघांच्या ताब्यातील किरकोळ विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या सुमारे साडे आठ हजाराचा गुटखा हस्तकरण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शिंदे व उपनिरीक्षक पावरा करीत आहेत.
………….
रौलटचा सुत्रधार जेरबंद
ग्रामिण पोलीसांची कारवाई
नाशिक : शहर आणि ग्रामीण भागात आॅनलाईन रौलेट नावाचा जुगार खेळविणारा मुख्यसुत्रधार पोलीसांच्या हाती लागला आहे. त्र्यंबकेश्वर तालूक्यातील एका शेतकºयाने आत्महत्या केल्यानंतर पोलीस संशयीताच्या मागावर होते. अटकपूर्व जामिनाच्या प्रयत्नात असतांना तो पोलीसांच्या जाळय़ात अडकला असून त्याच्या अटकेने बेकायदा व अनेकांचे संसार उध्वस्त करणाºया रौलट जुगाराचा भांडाफोड करण्यात पोलीसांना यश येईल असा विश्वास पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
अधिक्षक पाटील म्हणाले, त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात मागील महिन्यात एका शेतकरी कुटुंबातील तरुणाने रौलेट जुगारात लाखो रुपये गमावल्याने विषारी औषध सेवन करत आत्महत्या केली होती. संदीप दिलीप मेढे (२७,रा.आंबोली) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचे वडील दिलीप नामदेव मेढे (५१) यांनी याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात दिलेल्या फियार्दीत संशयित कैलास शहा याच्याकडून होणारा त्रास अन् त्याच्या साथीदारांकडून वारंवार दिल्या जाणा-या धमक्या यामुळे संदिपने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी त्र्यंबक पोलीसांनी संशयीत शहा याच्यासह दोघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात शहा याच्यासह शांताराम पगार व सुरेश अजुर्न वाघ हे तीघेही फरार होते. पोलीस त्यांच्या मागावर होते. बुधवारी (दि.१०) गोपनीय माहितीच्या अधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहा यास जेरबंद केले. तो अटकपूर्व जामिन मिळविण्याच्या प्रयत्नात होता. शहा याचे दोघे साथीदार अद्याप फरार असून ते लवकरच पोलीसांच्या हाती लागतील असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. या पत्रकार परिषदेस अपर पोलीस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर उपस्थीत होत्या.