नाशिक – भारतीय जनता पक्षाची शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून त्यात विद्यमान शहराध्यक्ष गिरीश पालवे यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. नव्या चेहऱ्यांना नव्या कार्यकारिणीत संधी देण्यात आली आहे.
प्रदेशाध्यक्ष चेंद्रकांत पाटील यांच्या संमतीनंतर पालवे यांनी शहर कार्यकारिणी जाहीर केली आहे. त्यानुसार, १० उपाध्यक्ष ४ सरचिटणीस, १० चिटणीस, कोषाध्यक्ष, आणि युवा मोर्चा महिला मोर्चा अध्यक्ष यांची नावे जाहीर केली आहेत.
सरचिटणीस
प्रशांत जाधव, पवन भगूरकर, जगन पाटील,
कोषाध्यक्ष
आशिष नहार
उपाध्यक्ष
रामहरी संभेराव, बाळासाहेब पाटील, हरिभाऊ लोणारी, सचिन ठाकरे, प्रकाश घुगे, कुणाल वाघ, यशवंत निकुळे, अलका जांबेकर, नीलेश बोरा, प्रा. वर्षा भालेराव
विविध आघाड्या
युवा मोर्चा अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते सुनील बागूल यांचे पुत्र मनीष बागुल. महिला मोर्चा अध्यक्षपदी नगरसेविका हिमगौरी आडके. अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्षपदी शशांक हिरे. किसान मोर्चा अध्यक्षपदी हेमंत पिंगळे. ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी चंद्रकांत थोरात. अल्पसंख्याक मोर्चा फिरोज शेख. अनुसूचित जमाती अध्यक्षपदी परशुराम वाघेरे यांची निवड करण्यात आली आहे.