शनिवार, सप्टेंबर 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाशिक शहरासह जिल्ह्यात कंटेनमेंट झोनमध्ये आता पोलिसाची नियुक्ती

by Gautam Sancheti
मार्च 22, 2021 | 4:00 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20210322 WA0023

– कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कंटेनमेंट झोनबाबत कडक अंमलबजावणी
– जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन केंद्राच्या प्रमुखांची बैठक संपन्न
नाशिक – कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासन व पोलीस विभागाच्या संयुक्त विद्यमाने पॉझिटीव्ह रुग्णाच्या परिसरात कंटेनमेंट झोनच्या नियमांची  कडक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आपत्ती व्यवस्थापन केंद्राच्या प्रमुखांच्या बैठकित सांगितले.
जिल्हाधिकारी सूरज मांढरे म्हणाले, कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकांची आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी कंटेनमेंट झोन जाहिर केला जाईल तेथील लोकांनी कोरोनाच्या सर्व मागदर्शक सूचनेचे पालन करणे आवश्यक आहे.
कंटेनमेंट झोनच्या अंमलबजावणीसाठी गेल्यावेळी प्रमाणे पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. तसेच या परिसराचे मॅपिंग व बारकोडींग करण्यात येणार असल्याचे , जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. ग्रामीण भागातील कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी मुख्याधिकारी यांची सेवा घेण्यात येवून त्यांना टेस्टींग व ट्रॅकिंगचा दैनंदिन अहवाल त्यांनी सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी यावेळी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित आपत्ती व्यवस्थापन केंद्राच्या प्रमुखांच्या बैठकित जिल्हाधिकारी  सूरज मांढरे बोलत होते. यावेळी महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या  मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, पोलीस उपायुक्त बारकुंड, अप्पर पोलीस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अतिरिक्त मनपा आयुक्त डॉ.प्रविण अष्टीकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे, महापालिकेचे वैद्यकिय अधिक्षक डॉ.बापूसाहेब नागरगोजे, अतिरिक्त जिल्हा चिकित्सक श्रीनिवास, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपिल आहेर, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे, अन्न व औषध प्रशासनाच्या सहआयुक्त माधुरी पवार उपस्थित होते.
ग्रामीण भागातील दौरे करणार
ज्या ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे, अशा तालुक्यात दौरे करुन आवश्यक आरोग्य सुविधांचा आढावा घेण्यात येईल. तसेच बाधित रुग्णांच्या  संपर्कातील व्यक्तींची शोध मोहिम, बाधित क्षेत्रातील ग्रामीण पोलीस पथकाच्या कार्यवाही बाबत माहिती घेण्यात येणार आहे.
एचआरसीटी सेंटरला तपासण्या झालेल्या रुग्णांमध्ये कोरोनासदृश्य रुग्ण आढळल्यास सेंटर चालकांनी  तात्काळ आरोग्य यंत्रणेला कळवावे. तसेच यावेळी जिल्हाधिकारी यांनी यावेळी शहरातील व जिल्ह्यातील ऑक्सिजन पुरवठ्याची, जिल्ह्यातील लसीकरणाचाही आढावा  घेतला.
शहरातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्या रोखण्यासाठी आवश्यकतेनुसार कोविड केअर सेंटर सुरु करण्यात येतील. तसेच कंटेनमेंट झोनबाबत शहरात कडक अंमलबजावणी करण्यात येणार असून यासाठी काटेकोर नियोजन करण्यात येणार असल्याचे, महानगरपालिका आयुकत कैलास जाधव यांनी सांगितले.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक कोरोना अपडेट – शहर व जिल्ह्यात आज एवढे आढळले कोरोनाबाधित

Next Post

राज्यामध्ये आता ड्रोनद्वारे वृक्षारोपण; यंदा ४ कोटी वृक्ष लागवड

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

cbi
संमिश्र वार्ता

CBI ने या स्पर्धा परिक्षा घोटाळ्यातील भरती प्रकरणी पाच आरोपींना केली अटक…IAS सह उच्च अधिकारी जाळ्यात

सप्टेंबर 20, 2025
cidco1 1024x683 1
महत्त्वाच्या बातम्या

या कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित असलेला प्रश्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोडवला..इतक्या कामगारांना मिळाले १० लाखाचे धनादेश

सप्टेंबर 20, 2025
modi 111
महत्त्वाच्या बातम्या

पंतप्रधानांच्या १३०० स्मृतिचिन्हे ई-लिलावात नाशिक मधील श्री काळाराम मंदिरातील चांदीचा राम दरबार…या संकेतस्थळावर द्या भेट

सप्टेंबर 20, 2025
G1Ovmg XYAAE7vR e1758332093239
मुख्य बातमी

आशिया कपमध्ये भारताचा सलग तिसरा विजय….ओमानला २१ धावांनी केले पराभूत

सप्टेंबर 20, 2025
ladki bahin 750x375 1
राज्य

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी संकेतस्थळावर e-KYC सुविधा सुरू….

सप्टेंबर 20, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
महत्त्वाच्या बातम्या

मोठा निर्णय….अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांचा परवानाच होणार निलंबित

सप्टेंबर 20, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना आरोग्याच्या तक्रारी भेडसावतील, जाणून घ्या, शनिवार, २० सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 19, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा मंत्री समिती गठीत…या सात मंत्र्यांचा समावेश

सप्टेंबर 19, 2025
Next Post
Hon cm sir forest meeting 1 1140x616 1

राज्यामध्ये आता ड्रोनद्वारे वृक्षारोपण; यंदा ४ कोटी वृक्ष लागवड

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011