नाशिक – शहरासह जिल्ह्यात सोमवारी (१४ डिसेंबर) २३७ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर २७९ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या १ लाख ५ हजार ५७२ झाली आहे. १ लाख २३८ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ८६७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या ३ हजार ४६७ जण उपचार घेत आहेत.
सोमवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक १८१, ग्रामीण भागातील ४६, मालेगाव शहरातील ५ तर जिल्ह्याबाहेरील ५ जणांचा समावेश आहे. तर, ३ मृतांमध्ये नाशिक शहरातील १ आणि ग्रामीण भागातील २ जणांचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ६९ हजार ३९४. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ६१२. पूर्णपणे बरे झालेले – ६६ हजार २०८. एकूण मृत्यू – ९३४. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – २ हजार २५२. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९५.४१
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ३० हजार ७८५. पूर्णपणे बरे झालेले – २९ हजार ०३६. एकूण मृत्यू – ७१७.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १ हजार ०३२. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९४.३२
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार ४५६. पूर्णपणे बरे झालेले – ४ हजार १२७. एकूण मृत्यू – १७२.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १५७. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९२.६२
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी