नाशिक – कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा सोमवारपासून (४ जानेवारी) सुरू होणार आहे. इयत्ता ९वी ते १२वीचे जिल्ह्यातील एकूण २ हजार २६७ शाळा सुरू होणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. नाशिक महापालिकेच्या १३ शाळांचाही त्यात समावेश आहे. आतापर्यंत ७२ टक्के शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. २८ टक्के पालकांनी संमती पत्र दिले असल्याचेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. इयत्ता ११वीचे वर्ही सुरू होणार आहेत. ज्यांचे प्रवेश झाले आहेत. ते विद्यार्थी वर्गात बसू शकणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेची योग्य ती काळजी घेतली जाणार आहे. मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.