नाशिक – नाशिक शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रार्दूभावामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक परिस्थिती निर्माण होऊ नये, या करीता तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्याने पोलीस आयुक्त दिपक पांण्डेय यांनी २३ डिसेंबर २०२० ते ५ जानेवारी २०२१ या कालावधीत रात्री ११ ते सकाळी ६ फौजदारी प्रक्रिया संहिता,१९७३ चे कलक १४४ (१)(३) अन्वये संचारबंदी आदेश लागु केले आहेत, असे नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी आदेशानुसार कळविले आहे.
आदेशात नमूद केल्यानुसार, या कालावधीच्या आदेशाची अंमलबजावणी करतांना कार्यक्षेत्रात सार्वजनिक व खाजगी आस्थापनांचे प्रमुख यांना आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालय यांनी सामाजिक अंतरासंदर्भात निर्गमित केलेल्या सुचनांचे पालन करणे बंधकारक आहे.
कंटोनमेंट झोन संदर्भातील शासनामार्फत वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले आदेश उपरोक्त कालावधीत सर्व संबंधितांना बंधनकारक राहतील. सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी व प्रवासादरम्यान नागरीकांनी चेहऱ्यावर मास्क लावणे बंधनकारक असून उघड्यावर व सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास बंदी राहील. सार्वजनिक ठिकाणी ५ किंवा ५ पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास प्रतिबंध असणार आहे. सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, गुटखा, तंबाखु यांचे सेवनास देखील प्रतिबंध करण्यात आला आहे.
वरीलप्रमाणे सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा समूह हे आपत्ती व्यवस्धापन अधिनियम २००५ चे कलम ५१ तसेच भारतीय दंड विधानाचे कलम १८८ तसेच इतर प्रचलित कायद्यातील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र रहातील, असे पोलीस आयुक्त दिपक पांण्डेय यांनी आदेशान्वये कळविले आहे.