शरद पवार मुंबईतून तर पालकमंत्री छगनराव भुजबळ नाशिकमधून संबोधणार
नाशिक – नाशिक शहरात शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून ऑनलाईन सभेचेही (व्हर्च्यूअल रॅली) आयोजन करण्यात आले आहे. या ऑनलाईन सभेमध्ये पालकमंत्री छगनराव भुजबळ सहभागी होणार असून ते मार्गदर्शन करणार असल्याची माहिती शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्र पगार, कोंडाजीमामा आव्हाड यांनी दिली आहे. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, देविदास पिंगळे, प्रदेश सदस्य नानासाहेब महाले, मा.आमदार जयंत जाधव, दिलीप खैरे, अर्जुन टिळे, विश्वास ठाकूर, अशोक सावंत, निवृत्ती अरिंगळे, गटनेते गजानन शेलार आदि उपस्थित राहणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशी (दि.१२) नेते मंडळी, पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकासह चाहते वर्ग शरद पवार यांची भेट घेऊन शुभेच्छा देतात. परंतु यंदा कोरोना विषाणूच्या महामारीमुळे गर्दी टाळणे महत्वाचे असल्याने सर्वांना हिरमोड होऊ नये याकरिता डिजिटल टेक्नोलॉजीच्या मदतीने हा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करणार आहे. शरद पवार मुंबई मधून संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसोबत ऑनलाईन सभेच्या माध्यमातून संवाद साधणार आहे. वैश्विक महामारीमुळे हा अनोखा प्रयोग करण्यात येणार असून यामुळे सोशल डिस्टेंसिंगचे पुरेपूर पालन होणार आहे. शरद पवार यांचा वाढदिवस अनोख्या व वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १२ डिसेंबर सकाळी ९.३० वाजता जयशंकर बँक्वेट हॉल, औरंगाबाद रोड येथे शरद पवार यांच्या सभेची सुरवात होणार आहे. राज्यातील प्रत्येक तालुक्यात व जिल्ह्यात ही ऑनलाईन सभा सर्वांना दिसणार आहे. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगनराव भुजबळ नाशिक मध्ये उपस्थित राहणार असून या ऑनलाईन सभेला ते प्रत्येक्ष संबोधित करणार आहे. तर पक्षातील प्रमुख नेते आपापल्या जिल्ह्यात उपस्थित राहून डिजिटल टेक्नोलॉजीच्या मदतीने या ऑनलाइन सभेला संबोधित करणार आहे. व्हर्च्यूअल रॅलीचा हा प्रयोग भारतात सर्वात प्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करत आहे.
नाशिक शहरातील विविध भागात सामाजिक कार्यक्रम घेण्यात येणार आहे. कार्यक्रमाची सुरवात सहा विभागात रक्तदान शिबिराने होणार आहे. १२ ते १५ डिसेंबर ज्युपिटर हॉस्पिटल अंबड, दिव्य स्पर्श मल्टी क्लिनिक सातपूर, ग्लोबल हॉस्पिटल त्रिमूर्ती चौक सिडको, वक्रतुंड हॉस्पिटल पाथर्डी फाटा, सदगुरू हॉस्पिटल निमाणी, सतीश शिंदे डेंटल क्लिनिक, आकाशवाणी टॉवर येथे आरोग्य तपासणी शिबीर, दि.११ ते १३ पंचवटी येथे क्रिकेट स्पर्धा, दि.१२ ते १४ पर्यंत आकाशवाणी टॉवर येथे व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजन, दि. १५ डिसेंबर पर्यंत संपूर्ण शहरात नवीन मतदार नोंदणी शिबीर, विद्यार्थ्यांच्या वतीने दि. ११ सर्व पोलीस स्टेशनमध्ये मास्क व सॅनिटाझर वाटप, युवतींना आर्यन वाटप, शहरातील विविध भागात वृक्षरोपण, कोविड योद्धा सन्मान, शहरात आरोग्य तपासणी शिबीर, ८१ घड्याळ व ५००० दिनदर्शिका वाटप ,स १० वा हनुमान वाडी पंचवटी जेष्ठ नागरिक मास्क व मफलर वाटप, दु. १२ आधार आश्रम ५० किलो तांदूळ, गहू, तांदूळ वडनेर दुमाला येथे PPE कीट वाटप, बिटको हॉस्पिटलमध्ये ऑक्सिमीटर वाटप, कोविड योद्धा सफाई कर्मचारी सत्कार, दि.१२ संध्या ६ वा वृद्धाश्रम अन्नदान, सामनगाव रोड, संध्या ७ वा. जिल्हा रुग्णालयात गरजूंना ब्लँकेट वाटप, दि १३ सिडको भागात स १० वा वृध्दांना फळ व मास्क वाटप, स ११ वा दिलासा वृध्दांश्रमात फळे व बिस्किटे वाटप, दु १ वा कारगील चौक सातपूर येथे १०० महिलांना साखर वाटप, विशेष मुलांचे वसतिगृह तवली फाटा येथे भोजन वाटप, दि १६ सिडको येथे स ११ वा १०० महिलांना साखर वाटप, दु १ वा जेल रोड येथे मोफत LED बल्ब माळ बनविणे प्रशिक्षण, दु २ वा सिव्हिल हॉस्पिटल, बालकक्षात फळे वाटप, दि १७ स ११ वा झाकिर हुसेन रूग्णालयात फळे वाटप, दु १ वा बिटको रूग्णालयात फळे वाटप व सफाई कामगार सत्कार, दि १८ दु १२ वा टाकळी गांव येथील गरीब गरजू लोकांना ब्लँकेट वाटप, दु १ वा गुरूगोविंद कॉलेज समोर रक्तदान शिबिर, ऑनलाईन निबंध, चित्रकला व रांगोळी स्पर्धा, कोविड योद्धाचा सन्मान, दुर्गम भागात कपडे वाटप वरील सर्व सामाजिक कार्यक्रमांत सहभागी व्हावे तसेच दि. १२ ला जयशंकर बँक्वेट हॉल मध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अंबादास खैरे, अनिता भामरे, गौरव गोवर्धने, धनंजय निकाळे, सलीम शेख, डॉ.अमोल वाजे, बाळासाहेब मते, राकेश मुंडावरे, शंकर पिंगळे, सुरेश आव्हाड, धनंजय रहाणे यांनी केले आहे.