शनिवार, ऑगस्ट 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक शहरात मारहाणीच्या घटना सुरूच; ३ गुन्हे दाखल

by Gautam Sancheti
फेब्रुवारी 27, 2021 | 9:54 am
in क्राईम डायरी
0
crime diary 1

बँक कर्मचा-यांना मारहाण
नाशिक – कर्ज वसूलीसाठी गेलेल्या बँक कर्मचा-यांना कार खरेदी विक्रीचा व्यवसाय करणा-या कर्जदाराने शिवागाळ करीत बेदम मारहाण केल्याची घटना महात्मानगर येथे घडली. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा व विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बॉबी श्रीचंद मुरजानी (रा.दत्तप्रभू बंगला,होंडा शो रूम जवळ,महात्मानगर) असे वसूली अधिका-यांना मारहाण करणा-या संशयीत कर्जदाराचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी युनियन बँकेच्या सातपूर शाखेचे प्रबंधक अजयसिंग सेगर यांनी तक्रार दाखल केली आहे. मुरजानी यांनी मालमत्ता तारण ठेवून युनियन बँकेच्या सातपूर शाखेतून कर्ज घेतले आहे. कर्जाची परतफेड न झाल्याने प्रबंधक सेगर आणि अमित व्यास हे वसूली अधिकारी गुरूवारी (दि.२५) दुपारी मुरजानी यांच्या घरी गेले असता ही घटना घडली. संशयीताने बँक अधिकाºयांना बंगल्यात बोलावून घेत तुमची हिम्मत कशी झाली माझ्या घरी येण्याची असे म्हणत शिवीगाळ केली. तसेच दोघा अधिका-यांना लाथाबुक्यांनी मारहाण करून बंगल्या बाहेर पडण्यास मज्जाव केला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बैसाणे करीत आहेत.
……
भूमाफीयांकडून घरात घुसून मारहाण
नाशिक – आनंदवली येथील मंडलीक खून प्रकरण ताजे असतांनाच भूमाफीयांनी घरात घुसून एकास मारहाण करण्यात आल्याची घटना पोकार कॉलनी परिसरातील साईनगर भागात घडली. याघटनेत दोघा संशयीतांनी जमिनीचा वाद मिटवा अन्यथा कुटूंबियास जीवे ठार मारू अशी धमकी दिली आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सागर मारूती भाबड (रा.दातली खोपडी ता.सिन्नर हल्ली पॅरामाऊन्ट बी विंग,मुंबईनाका) व योगेश कुटे (नाव गाव पूर्ण नाही) अशी मारहाण करणा-या संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी लक्ष्मण सुधाकर गायकवाड (रा.साईनगर,पोकार कॉलनी) यांनी तक्रार दाखल केली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार गायकवाड यांची जोरण ता.दिंडोरी येथे आईची वडिलोपार्जीत शेत जमिन आहे. त्यातील आठ एकर जमिनीचा पंधरा वर्षापूर्वी साठे खताद्वारे व्यवहार झाल्याचे भासवून सचिन धात्रक याने ताबा घेतला आहे. यापोटी दीड कोटी रूपये अदा करण्यात आल्याचा त्याचा दावा आहे. ही जमिन खरेदी करून द्यावी यासाठी भुमाफीयांकडून गायकवाड कुटूंबियास त्रास दिला जात असल्याचा आरोप होत आहे. तक्रारदार गायकवाड व त्यांचे वडिल शुक्रवारी (दि.२६) सायंकाळच्या सुमारास आपल्या घरात असतांना ही घटना घडली. दोघा संशयीतांनी अनधिकृतपणे घरात प्रवेश करून शिवीगाळ करीत लक्ष्मण गायकवाड यास लोखंडी फायटरने मारहाण केली. यावेळी तुझ्या आईला सचिन धात्रकच्या कागदपत्रांवर साक्षरी करण्यास सांग अन्यथा कुटूंबियांस संपवून टाकू अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास हवालदार देवरे करीत आहेत.
…..
टोळक्याकडून एकास मारहाण
नाशिक – जुन्या वादाची कुरापत काढून एकास टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना कमोदनगर येथे घडली. या घटनेत त्रिकुटाने बांबू आणि दगडाचा वापर केल्याने तरूण जखमी झाला असून, याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभि वैद्य,सागर वैद्य व गौरव गौर अशी मारहाण करणाºया संशयीतांची नावे आहेत. अनिकेत श्रीकृष्ण समुद्रवार (२५ रा.गणपती मंदिराजवळ,कमोदनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. समुद्रवार गुरूवारी (दि.२५) रात्री इच्छापूर्ती गार्डन परिसरात उभा असतांना त्यास त्रिकुटाने गाठले. यावेळी जुन्या भांडणाची कुरापत काढून संशयीतांनी शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली. या घटनेत लाकडी बांबू आणि दगड फेकून मारल्याने अनिकेत समुद्रवार जखमी झाला असून त्यास सशयीतांनी तुझा बेत पाहतो अशी धमकी दिली आहे. अधिक तपास पोलीस नाईक बरेलीकर करीत आहेत.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – वेगवेगळ्या अपघातात २ ठार; २ जखमी

Next Post

खाकी वर्दीतल्या वऱ्हाडींमुळे लग्न थांबल चक्क ६ महिन्यांपासून; वाचा इंटरेस्टिंग बातमी

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post

खाकी वर्दीतल्या वऱ्हाडींमुळे लग्न थांबल चक्क ६ महिन्यांपासून; वाचा इंटरेस्टिंग बातमी

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Untitled 6

उत्तरकाशीमधून महाराष्ट्रातील ११ पर्यटकांसाठी एअर लिफ्ट…राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

ऑगस्ट 9, 2025
jail11

भाजीपाला व्यावसायीकास मारहाण करीत लुटणा-या तिघांना पोलीसांनी ठोकल्या बेड्या

ऑगस्ट 9, 2025
RUPALI

पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात रुपाली चाकणकर यांनी पोलिस महासंचालकांना दिले हे पत्र

ऑगस्ट 9, 2025
प्रातिनिधिक फोटो

रेल्वेने या पॅकेज अंतर्गत मूळ भाड्यात जाहीर केली २० टक्के सुट

ऑगस्ट 9, 2025
fir111

सोसायटीच्या लाईट बीलाच्या वादातून महिलेस घरात घुसून बेदम मारहाण…पाच महिलांविरोधात गुन्हा दाखल

ऑगस्ट 9, 2025
crime11

डिजिटल अ‍ॅरेस्टची धमकी देत सायबर भामट्यांनी नाशिक शहरातील तिघांना घातला एक कोटीला गंडा

ऑगस्ट 9, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011