शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांच्या आत्महत्या
नाशिक : शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघा तरुणांनी गळफास घेत आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत.
देवळाली गावातील गाडेकर मळा परिसरात २६ वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. मयुर दिलीप गिलढा असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. मयुर याने शुक्रवारी (दि.२०) रात्री गळफास घेतल्याचे आढळून आले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गंगापूर गावातील लक्ष्मण पोपट गायकवाड (३५) यांनी राहत्या घरात गळफास घेतल्याचे आढळून आले. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे प्रशांत प्रकाश घोगरे (२७, रा. नवनाथ नगर, पंचवटी) याने राहत्या घरात गळफास घेतल्याचे आढळून आले. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.……

पवार मेडिलक कॉलेजच्या पार्किंगमध्ये दुचाकी लंपास
नाशिक : डॉ. वसंतराव पवार मेडिलक कॉलेजच्या पार्किंगमध्ये उभी केलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली.
याप्रकरणी कृष्णा भरत आणेराव (रा. वसंतराव पवार मेडिकल कॉलेज होस्टेल) यांनी फिर्याद दिली आहे. ८ नोव्हेंबर रोजी आणेराव यांनी त्यांची मोटारसायकल पार्किंगमध्ये उभी केली होती. अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली.आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
…….
लाखलगाव शिवारात मृतदेह आढळला
नाशिक : लाखलगाव शिवारात अंदाजे ५० वर्षीय पुरुषाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी (दि.२०) सकाळच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार रेल्वेच्या धडकेत या व्यक्तीचा मृत्यू झाला. आडगाव पोलीस मृतदेहाची ओळख पटवत आहेत. आडगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.