नाशिक – नाशिक पोलीस आयुक्तालय हद्दीतील पोलीस ठाण्यातर्गत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर परिसरातून पोलिसांनी संचलन केले. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ एक आणि दोनमधील १३ पोलीस ठाण्यांमध्ये पोलिसांनी संचलन केले. यावेळी पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह राखीव पोलीस दलाचे जवान यात सहभागी झाले होते. शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच गुन्हेगारीवर वचक बसावा यासाठी शहरात संचलन करण्यात आले. अंबड, मुंबई नाका, भद्रकाली, पंचवटी, सातपूर, उपनगर, नाशिकरोड, इंदिरानगर या पोलीस ठाण्यातर्गत मोठ्या संख्येने पोलीस संचलनात सहभागी झाले होते.