नाशिक : शहरात धुमाकूळ घालणा-या सात गावगुंडाना पोलीसांनी तडीपार केले आहे. त्यातील चौघांना दोन वर्ष तर तीघांना एक वर्षासाठी शहर आणि जिह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश परिमंडळ १ चे उपायुक्त अमोल तांबे यांनी जारी केले आहेत.
सुरज उर्फ चाचा निवृत्ती चारोस्कर (२० रा.म्हसरूळ),गणेश बाबुराव धात्रक (२६ रा.स्वामी विवेकानंद नगर,म.बाद),विजय कुमार पुंडलीक गांगोडे (२३ रा.म्हसरूळ),गणेश पंढरीनाथ धोत्रे (३८ रा.एरिगेशन कॉलनी,म.बाद),पप्पू मंगलसिंग भोंड (३५),गणेश झुंबर आहेर (रा.दोघे कातारगल्ली,फुलेनगर) व सागर उर्फ कडक्या गणपत बोडके (२१ रा.फुलेनगर) अशी तडिपार करण्यात आलेल्या संशयीतांची नावे असून त्यातील वरिल तिघांना अनुक्रमे एक तर उर्वरीतांना दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. संशयीताविरोधात शरिराविरूध्दचे गंभीर गुन्हे दाखल असल्याने चौकशी अंती त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्या आदेशान्वये दोन पेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या व समाजात उपद्रव करणाºयासह गँग तयार करणाºयांंविरोधात शहर पोलीसांनी तडिपारीचा बडगा उगारला आहे.