नाशिक – लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यापासून शहरातील वर्दळीत वाढ झाल्याने चेन स्नॅचर्सही सक्रीय झाले आहेत. शहरात चेन स्नॅचिंगच्या घटना वाढत असून तशा तक्रारी विविध पोलिस स्टेशनमध्ये दाखल होत आहेत.
सोमवारी संध्याकाळच्या सुमारास अंबड येथील कामटवाडा परिसरात महिलेची सोन्याची चेन अज्ञातांनी लंपास केली. या विरुद्ध अंबड पोलीस स्टेशन येथे दोन अज्ञातांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. संध्याकाळच्या सुमारास प्रणय बस स्टॉप येथे उभ्या असलेल्या महिलेची २७००० रुपयांची सोन्याची चेक अज्ञातांनी लंपास केलीस. दोन संशयित व्यक्ती बाईकवरून आले व त्यांनी चेन चोरल्याचे महिलेले सांगितले आहे. पोलीस यासंबधी तपास करत आहेत. त्याचप्रमाणे मुंबई नाका परिसरातील ५३ वर्षीय महिलेची सोन्याची चेन अज्ञातांनी लंपास केल्यास समोर आले आहे. जुलै अखेरीस चेन स्नॅचिंगच्या ४१ तक्रार दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.