नाशिक – शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तपासणीला वेग देण्यासाठी आणखी एक लाख अँटीजन टेस्ट कीट घेण्याचा निर्णय महापालिका स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. शहरात नगरसेवकांच्या माध्यमातून ठिकठिकणी तपासी शिबीरे आयोजित केली जात आहेत. त्यात या कीटमुळे वाढ होणार आहे. तसेच, तपासणीमुळे कोरोना बाधित कळू शकणार आहेत. परिणामी, सौम्य लक्षणे असणाऱ्यांवर तातडीने उपचार सुरू होणार आहेत. यामुळे कोरोना मृत्यूचे प्रमाण घटविण्यात तसेच उपचार घेऊन बरे झालेल्यांमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे. महापालिकेने यापूर्वी २ कोटी २६ लाख रुपयांचे कीट खरेदी केले आहेत.