शहरातून दोन मुलांचे अपहरण
नाशिक : शहरातून दोन मुलांचे अपहरण झाल्याप्रकरणी संबधित पोलीस ठाण्यांमध्ये स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पहिला गुन्हा म्हसरुळ पोलीस ठाण्यात दाखल झाला. परिसरातील एका महिलेने फिर्याद दिली असून ३१ डिसेंबर रोजी या महिलेच्या अल्पवयीन मुलीस अज्ञात व्यक्तीने कशाचे तरी आमिष दाखवून पळवून नेल्याचे फिर्याद म्हटले आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरिक्षक माळी तपास करत आहे. दुस-या घटनेप्रकरणी पवन नगर पसिरातील मुलाच्या वडीलांनी अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शुक्रवार (दि. ३०) रोजी फिर्यादी यांचा मुलगा नेहमीप्रमाणे खेळण्यासाठी गेला असता पुन्हा घरी परतला नाही. तसेच तो नातेवाईकांकडेही मिळून आला नाही, त्यामुळे अज्ञात व्यक्तीने त्यास फुस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करत मुलाच्या वडीलांना फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरिक्षक सोनवणे तपास करत आहे.
…..
मोटारसायकल चोरी
नाशिक : अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये उभी केलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी मिलींद विनायक नागरे (रा. श्रीयोग अपार्टमेंट, पाथर्डी शिवार) यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बुधवार (दि. ३०) रोजी नागरे यांनी त्यांची मोटारसायकल क्र. (एमएच १५ जीडी ९०७१) अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती. यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांची ही मोटारसायकल चोरून नेली. या प्रकरणी हवालदार राणे तपास करत आहे.
——-
संंचारबंदी आदेश उल्लंघनप्रकरणी गुन्हा
नाशिक : संचारबंदीचे आदेशाचे उल्लंघन करत मध्यरात्रीच्या वेळी मद्यधुंद अवस्थेत फिरणा-याविरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहूल अंबादास हांडगे (रा. राणेनगर), मयूर भालचंद्र अग्रवाल (रा. कॉलेजरोड) अशी संशयितांची नावे आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शहरात रात्री ११ ते सकाळी ६ यावेळेत संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे. या आदेशाचा भंग करत ३१ डिसेंबरच्या रात्री सव्वादोन वाजेच्या सुमारास दोघे संशयित पिनॅकल मॉल परिसरात मद्यधुंद अवस्थेत आढळून आले. त्यामुळे पोलीस शिपाई अनिल किसन आव्हाड यांनी त्यांच्याविरोधात फिर्याद दिली असून हवालदार आर. व्ही. सोनार तपास करत आहे.
————
गळफास घेत आत्महत्या
नाशिक : गळफास घेवून तरुणाने आत्महत्या केल्याची घटना वडनेर दुमाला परिसरात घडली. चेतन संजय सावंत (रा. राजवाडा बुद्धविहारजवळ, वडनेर दुमाला) असे आत्महत्या करणा-या व्यक्तीचे नाव आहे. गुरुवार (दि. ३१) सकाळी सव्वाअकरा वाजेच्या सुमारास चेतन याने राहत्या घरी ओढणीच्या सहायाने गळफास घेतला. त्यास बिटको हॉस्पिटलध्ये दाखल करण्यात आले होते.