नाशिक – मिठाईच्या बॉक्सवर एक्सपायरी डेट म्हणजे उपयुक्ततेची तारीख (बेस्ट बिफोर) लिहीली नसल्याच्याविरूद्ध कारवाई करण्यास अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सुरवात केली आहे. गेल्या चार दिवसांत एफडीएने शहरातील सहा मिठाई विक्रेत्यांना १७ हजार रुपये दंड ठोठावला आहे.
एफडीएच्या नाशिक कार्यालयाने मिठाई विक्रेत्यांना विकल्या जाणाऱ्या सर्व मिठाई उत्पादनांवर ‘बेस्ट बिफोर’ ठेवणे बंधनकारक केले आहे. एफडीए नाशिकचे सहसंचालक चंद्रशेखर साळुंके म्हणाले की, दि. १ ऑक्टोबरपासून ‘बेस्ट’ लेबल लावण्याची सक्ती (अनिवार्य ) करण्यात आले होते. या नियमांची अंमलबजावणी होण्यापूर्वी एफडीएने शहरातील मिठाई विक्रेत्यांसमवेत बैठक आयोजित केली होती.
बहुतेक मिठाई दुधावर आधारित असल्याने त्या जलद खराब होतील म्हणून त्यांनी याबाबत त्यांची अडचण सांगितली. परंतु ग्राहकांचा आरोग्याबाबत जनजागृती केल्यानंतर अन्न निरीक्षकांनी नवीन नियम पाळला आहे की नाही याची तपासणी करण्यासाठी मिठाईच्या दुकानांना भेट देण्यास सुरूवात केली, असे साळुंके म्हणाले.
गेल्या चार दिवसांत, अन्न निरीक्षकांनी शहरातील ३६ मिठाई दुकानांना भेट दिली आणि त्यापैकी ३० नवीन नियमांचे पालन करत असल्याचे आढळले, त्यातील सहा जण मात्र नियमांचे पालन करीत नाही म्हणून या सहा मिठाई विक्रेत्यांना नोटिसा दिल्या नंतर त्यांनी एफडीए कार्यालयात येऊन १७ हजार रुपये दंड भरला, साळुंके म्हणाले की, सणासुदीचा हंगाम सुरू झाल्यापासून खाद्य निरीक्षक या दुकानांवर वारंवार भेट देत आहेत.