नाशिक – शहरातील पाणीपुरवठा येत्या शनिवारी २० फेब्रुवारी बंद राहणार आहे. तशी माहिती नाशिक महापालिकेने दिली आहे.
हे आहे कारण
गंगापूर धरण रॉ वॉटर पंपींग स्टेशन येथे महिंद्रा फिडरवरील आऊटगोईंग क्युबिकल येथे केबल किट नादुरुस्त झाले. त्यामुळे या ठिकाणी मिटरींग क्युबिकल बायपास कनेक्शन करण्यात आले आहे. आता या ठिकाणी मिटरींग क्युबिकल केबलची जोडणी करुन टेस्टिंग करणे आवश्यक आहे. हे काम येत्या शनिवारी सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत केले जाणार आहे. त्यामुळे महावितरण कंपनीकडून वीज पुरवठा खंडीत ठेवला जाणार आहे. परिणामी, शनिवारचा दुपारी व सायंकाळी पाणी पुरवठा होणार नाही.
या भागात पाणी नाही
नवीन नाशिक विभाग :- प्र.क्र. २४, २५, २६ व २८ येथील उंटवाडी जगताप नगर, कालिका पार्क, इंद्रनगरी, कामटवाडे परिसर, पवननगर, आयटीआय पूल, शिवशक्ती चौक, शाहू नगर, खुटवड नगर, बंदावणे नगर, साळूंखे नगर, महालक्ष्मी नगर, डीजीपी क्र. २, मुरारी नगर, वावरे नगर, अंबड माऊली लॉन्स परिसर इ.
नाशिक पूर्व विभाग :- वडाळा गांव, गावठाण परिसर, वडाळा रोड, जे. एम. सिटी कॉलेज, जयदीप नगर, साईनाथ नगर, विनयनगर परिसर, द्वारका व काठे गल्ली, जयशंकर नगर, टाकळी रोड परिसर, उपनगर पगारे मळा, प्र.क्र. २३ मधील अशोका मार्ग, हिरे नगर, टागोर नगर, डीजीपी नगर व गांधनीगर जलकुंभ १, २, ३ व ४ प्र.क्र. १६ मधील आंबेडकर नगर, सिध्दार्थ नगर, शिवाजीनगर परिसर, उत्तरा न गर, बोधलेनगर, गायत्रीनगर, अयोध्यानगर, प्र.क्र. २३ मधील डीजीपी नगर (भागश: कल्पतरुनगर, हॅपी होम कॉलनी, व बजरंगवाडी इ. भागातील दुपारचा व सायंकाळचा पाणी पुरवठा होणार नाही.
तसेच रविवारी (२१ फेब्रुवारी) सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने व कमी प्रमाणात होईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे महापालिकेने कळविले आहे.